ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!

ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!

Pankaja Munde : गेल्या दहा दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबोसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण स्थगित केले.

तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी त्यांचा उपोषणाला स्थगिती दिल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेत माघार घेण्याचा प्रश्नच नाही. संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत झालं पाहिजे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही असं म्हंटले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे म्हणाले, सरकारने हाकेंच्या उपोषणाची दखल घेतली ही चांगली गोष्ट आहे. सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतलं असेल मात्र त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये असं देखील पंकजा मुंडे म्हणाले.

हाके आणि वाघमारे यांनी ज्या मागण्या दिल्या त्या मागण्या सरकारने पूर्ण करावे तसेच चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात येत असेल तर त्याचा देखील तपास झाला पाहिजे आणि जे चुकीचे आहे ते रद्द केलं पाहिजे जर चुकीचा नसेल तर त्यावर कुणाला काही अडचण नाही असेही पंकजा मुंडे म्हणाले.

तसेच हाके यांचे सालस उपोषण आहे त्यांची भाषा नम्र आहे, त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून एक रिस्पेक्ट येते बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नाही. मी यापूर्वी देखील म्हटलंय आहे ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. राज्यात सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. आपण सर्वजण संविधानाच्या आधीन आहोत. कोणताही समाज संविधानाच्यावर नाही त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र बसून मार्ग काढले पाहिजे.

‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

माघार घेण्याचा प्रश्नच नाही. जे संविधानात लिहिलंय त्या चौकटीत झालं पाहिजे त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही. जर एखाद्या समाजाला न्यूनगंड वाटत असेल तर त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. असंही या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज