छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? रोहित पवारांनी वेळही सांगितली

छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? रोहित पवारांनी वेळही सांगितली

Rohit Pawar On Chagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal)हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ हे पुन्हा एकदा पक्षांतर करणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP)त्यांना डावललं जात असल्याच्या चर्चाही त्यांच्या कार्यर्त्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. त्यामुळे ते आता अजितदादांची (Ajit Pawar)साथ कुठपर्यंत देणार? हे काही सांगता येणार नाही. त्यातच ते दादांची साथ सोडून इतर पक्षांमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. काही दिवसांपासून त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटना पाहून ते किती नाराज असू शकतात? याचा अंदाज लावता येईल. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले आहे.

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, आमच्यात भांडणं लावून सरकार…; जरांगेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर शरद पवारांबरोबर (Sharad Pawar)राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळापासून सोबत असणारे छगन भुजबळ यांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा (Nashik Loksabha Election)मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. पण महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं शब्द दिल्यानंतरही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. शेवटी त्यांना स्वतःहून माघार घ्यावी लागली. ही उमेदवारी छगन भुजबळ यांना मिळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही काही प्रयत्न करण्यात आले नाही.

दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर

पुढे राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील होते, मात्र त्यांना तिथेही डावलण्यात आले. भुजबळ यांना बाजूला सारुन राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. आणि त्या ठिकाणी त्या बिनविरोध निवडून देखील आल्या. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अजितदादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतरची पदं ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत.मात्र पक्षातील महत्वाची पदं ही या वरील नेत्यांकडे आहेत. या ठिकाणी देखील छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. त्यामुळेच भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असून शरद पवारांकडे किंवा शिवसेना ठाकरे गटाकडे परतणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवार यांनीही त्यावर भाष्य केले आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच पक्ष सोडतील, असाही दावा त्यांनी केला आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.

उद्या काय होणार आहे, याचा अंदाज जवळपास सर्वांनाच आला आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर फक्त छगन भुजबळ हेच नाही तर इतरही अनेक नेते अजितदादांची राष्ट्रवादी सोडण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अधिवेशन 27 जूनपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप होणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज