Nashik Loksabha : मनधरणी निष्फळ! शांतगिरी महाराज निवडणूक लढवणारच; महायुतीचं गणित बिघडणार?
Nashik Loksabha : नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) निवडणुकीत शांतगिरी महाराजांनी (Shantgiri Maharaj) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलायं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवसाअखेर महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, ही मनधरणी निष्फळ ठरली असल्याचं दिसून येत आहे. कारण शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला असून ते अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीची गणितं बिघडणार असल्याचं बोललं जात आहे.
‘तुमच्या विधानाचा बदला जनता घेणारच’; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना ठणकावून सांगितलं…
नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून दावा ठोकण्यात आला होता. मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक लोकसभा खेचून आणण्यात यशस्वी ठरले आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडले यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शांतगिरी महाराजही अर्ज दाखल रिंगणात उतरले आहेत.
साहेब, तुम्ही तब्बेत जपा, आता आम्ही खिंड लढवतो..! शरद पवारांसाठी बीडच्या शिलेदाराचे भावूक उद्गार
नाशिकमध्ये आता शांतगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीची मतांमध्ये फुट पडणार असल्याचं बोललं जात आहे. शांतगिरी महाराजांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करण्यात येत होती. मात्र, शांतगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. खरं हिंदुत्व कोणाचं हे आता जनताच ठरवणार आहे, त्यामुळे महायुतीने मला प्राधान्य द्यावे, असं शांतगिरी महाराजांनी स्पष्ट केलं आहे.
“अरे मामा जरा जपून, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही”; दत्तामामा भरणेंना शरद पवारांचा दम
दरम्यान, नाशिक लोकसभेत शांतगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आता तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. येत्या २० तारखेला नाशिकमध्ये मतदान पार पडणार आहे, नाशिकमध्ये कोण बाजी मारणार? हे आता मतदानानंतरच क्लिअर होणार आहे.