प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग

  • Written By: Published:
प्रत्येक नाशिककरांना गोडसेंचा परिचय; उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी सांगितलं पुढचं प्लॅनिंग

नाशिक : अखेर नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार हेमंंत गोडसेंना (Hemant Godse) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर राष्ट्रवादी, भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला होता. तर, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा लढवण्यास इच्छूक होते. मात्र, अखेर गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्बत झाले असून, गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच भुजबळांनी त्यांना विजयी करण्याचा पुढचा प्लॅन जाहीर केला आहे. तसेच संपूर्ण नाशिककरांना गोडसेंचा परिचय आहे त्यामुळे   त्यांचे नाव जाहीर होणे अपक्षित होते. प्रचारासाठी वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसे नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे दहा वर्ष ते खासदार आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सोपे जाईल असे भुजबळांनी मान्य केले आहे. (Chhagan Bhujbal Reaction On Hemant Godse Nomination For Nashik Loksabha)

मोठी बातमी : अखेर एकनाथ शिंदेंनी हट्ट पूर्ण केलाच; नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, हेमंत गोडसे सध्या सीटिंग एमपी आहेत खासदार आहेत त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा केला होता. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता असून, मोठी मिरवणूक निघेल असेही भुजबळ म्हणाले. शिवाय संपूर्ण नाशिक मतदार संघातील आणि दिंडोरी मतदार संघातील जेवढे महायुतीचे कार्यकर्ते आहेत सर्व एकत्र येतील मिरवणुकीत सामील होतील.

अजितदादा पुन्हा दैवत बदलतील; राऊतांनी भाकित करत सांगितलं वर्ष अन् कारण

वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे दहा वर्ष खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाणार असून, उर्वरित पंधरा-सोळा दिवसात आम्ही पूर्ण ताकदीन गोडसेंच्या प्रचाराचं काम करू असे सांगत मोदींसाठी आम्ही नाशिकमधून खासदार निवडणून आणूच असा विश्वासही भुजबळांनी बोलताना व्यक्त केला. आपण सगळ्यांनी काम करत राहिले पाहिजे मला खात्री आहे, मी आणि माझ्याबरोबरचे कार्यकर्ते हितचिंतक सगळे विचार मागे सोडून आणि मजबुतीने महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागू असे भुजबळ म्हणाले.

गोडसेंनी भुजबळांच्या हातातून नाशिक खेचून आणलं; त्याचीच ही गोष्ट

…त्यावेळी गोडसेंना मोदींचा पाठिंबा होता

भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, 2019 ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरोधात होतो त्यावेळेला हेमंत गोडसे मोदींचा पाठिंबा होता. 2014 आणि 2019 ला पण शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती मोदींच्या पाठिंब्यावर ते पुढे निवडून आले. दोन वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सरकारमध्ये बसलो होतो. गोडसे आणि शिंदे आमच्या बरोबर होते शिंदे सरकारमध्ये होते असे सांगत राजकारणात या उलाढाली होत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज