गोडसेंनी भुजबळांच्या हातातून नाशिक खेचून आणलं… त्याचीच ही गोष्ट

गोडसेंनी भुजबळांच्या हातातून नाशिक खेचून आणलं… त्याचीच ही गोष्ट

“उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही घोषणा झालेली नाही. विरोधकांचा प्रचारही खूप पुढे गेला आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो. तो बसू नये म्हणून मी उमेदवारीतून माघार घेत आहे”. छगन भुजबळ यांचं हे चार वाक्यांचं निवेदन खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), शिवसेना-भाजपचे (BJP) राज्यातील नेते या सगळ्यांनाच सुखावणार ठरलं. भुजबळांनी (Chhagan bhujbal) माघार घेतल्याने आता ही जागा शिवसेनेकडेच राहणार हे निश्चित झालं आहे. उमेदवार कोण असणार हे काही तासांत स्पष्ट होईल. पण गोडसेच असतील हे जवळपास नक्की जात. थोडक्यात गोडसेंनी भुजबळांच्या हातातून ही जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली आहे. पण गोडसेंनी ही मोहीम फत्ते कशी केली? त्यांनी बलाढ्य भुजबळांच्या आणि राष्ट्रवादीच्या हातातून नाशिकची जागा खेचून कशी आणली त्याचीच ही गोष्ट…

भुजबळांनी सांगितलं की होळीच्या दिवशी त्यांना अजितदादांनी देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं. म्हणजेच 25 मार्चला नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवणार आणि भुजबळ उमेदवार असणार यावर प्राथमिक चर्चा झाली. वेळ कमी असल्यानं त्यांनी तडक नाशिक गाठलं आणि चाचपणी सुरु केली. इकडे नाशिकची जागा राष्ट्रवादीला जातीय याची कुणकुण हेमंत गोडसेंना लागली. त्यांनी 27 मार्चला मुंबईचा रस्ता धरला. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला. दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष नवीन नाही. पण ते भुसेही गोडसेंसोबत या ठिय्यामध्ये होते.

Lok Sabha Election : संभाजीनगरची लढत फिक्स ! खैरेंविरोधात मंत्री संदीपान भुमरेंना उमेदवारी

शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना पराभूत तर केलेच शिवाय ‘डीपीडीसी’च्या निधी वाटपावरून छगन भुजबळ यांना अंगावर घेतले होते. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करताना भुजबळ यांना विरोध केला. आधीच भाजपच्या दबावात येऊन हिंगोली आणि रामटेकचे उमेदवार बदलले होते. त्यात गोडसेंनी अचूक टायमिंग साधत दादा भुसे आणि सुहास कांदेंच्या साथीने दिलेल्या ठिय्याची राज्यात चर्चा झाली. शिंदेंसोबत आलेल्या इतर आमदार आणि खासदारांच्या दृष्टीनेही हा ठिय्या महत्वाचा ठरला.

पण गोडसे इथेच थांबले नाहीत. त्यांनी मागच्या तीन आठवड्यात एकनाथ शिंदेंची तब्बल दहावेळा भेट घेतली. म्हणजे दर एक दिवसाआड ते शिंदेंची भेट घेत राहिले. यामुळे सोबत आलेले आमदार खासदार, अस्वस्थ होत आहेत, आपण त्यांचा विश्वास गमावत आहोत, याची जाणीव शिंदेंना झाली. नाशिकची जागा गोडसेंनीच शिंदेंसाठी प्रतिष्ठेची केली. त्यातून त्यांना आक्रमक भूमिका घेणं भाग पडलं. इथेच नाशिकची जागा आपल्याला सहज मिळणार नाही, याचा अंदाज भुजबळांना आला. नाशिकची जागा राष्ट्रवादीला त्यातही भुजबळांना देण्यास जेवढा शिवसेनेचा विरोध होता तेवढाच भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही विरोध होता.

मराठा-ओबीसी वादात दोन्ही समाजाला समान न्याय देण्याच्या भूमिकेत भाजपला मराठा नेत्यांबरोबरच ओबीसींचा आक्रमक नेता म्हणून छगन भुजबळ हवे होते. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीला राज्यातील नेत्यांनीही बळ दिलं. पण, हे समीकरण स्थानिक पातळीवर मान्य नव्हतं. त्याला सामाजिक वादाबरोबरच अनेक कंगोरे होते. 2014 च्या निवडणुकीत याच हेमंत गोडसे यांनी भुजबळांचा पराभव केला होता. 2019 मध्ये तर ‘ईडी’कडून चौकशी सुरू असताना भुजबळ यांनी त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना पुन्हा उभे करून जुगार खेळला; पण अपेक्षीतरीत्या गोडसे यांना बाय मिळाला.

भाजपनं 35 वर्षांपूर्वी सोडला होता कोकणचा नाद… आता ‘राणेंना’ कमळ फुलवायला जमणार का?

नाशिक आणि भुजबळांची ही पूर्वपिठीका पाहून यंदाही भुजबळांच्या विजयावर शिवसेनेएवढेच भाजपचे नेतेही शंका घेत होते. अशात सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीच्या सर्व जागांवर विरोधी भूमिका घेऊन असं जाहीर केलं होतं. थोडक्यात सर्व इनपुट्स भुजबळ यांच्यासंदर्भात नकारात्मक होते. पण खुद्द भाजपचे शीर्ष नेते अमित शहा यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यानं सारेच गार पडले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून महिना उलटला, उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही उमेदवारी घोषित झाली नाही. भुजबळ यांच्यासारख्या बलशाली नेत्याच्या दृष्टीने हे धक्कादायक होते.

यातूनच नाशिकमध्येच माध्यमांशी बोलताना त्यांनी कोणालाही उमेदवारी द्या; परंतु एकदाची उमेदवारी घोषित करा, असे उद्वेगाने भुजबळांना म्हणावे लागले. त्यात फरक न पडल्याने अखेरीस त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. या घोळात ओबीसी समाजर दुखावला जाण्याची शक्यता होती. बहुसंख्य समाजाच्या दबावाखाली दिग्गज ओबीसी नेत्याला माघार घ्यावी लादत असेल तर त्याचाही फटका महायुतीला राज्यात बसू शकतो ही शक्यता गृहीत धरुन भुजबळ यांनाच माघारीची पत्रकार परिषद घ्यावी लागली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज