संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती; इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरुन सध्या

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यात मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरुन सध्या राजकीय वातावरण तापले असून विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या निर्णायविरोधात माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी बिर्याणी खाण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले होते. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल करत जलील हे नाटक फक्त टीआरपीसाठी करत असल्याचे म्हटले आहे. तर आता या टीकेला इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर देत संजय शिरसाट यांना पिण्याबद्दल विचारा कोणते कोणते ब्रँड आहेत हे त्यांना माहिती आहे अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी मार्केटमध्ये गेलो तर मटण आणू शकतो, कधी चिकन आणू शकतो. त्यांच्या बॅगेत काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि हे काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना पिण्याबद्दल विचारा कोणते कोणते ब्रँड आहेत हे त्यांना माहिती असते. अशी टीका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केली.

तसेच एकदा प्यायल्यानंतर त्यांच्यापुढे जर तुम्ही त्यांच्यासमोर शाकाहारी जेवण ठेवलात आणि ते चिकन आहे असं सांगितलं तर ते देखील खाऊ शकतात असं देखील यावेळी इम्तियाज जलील म्हणाले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, तुमच्या बॅगेत काय काय सापडलेले आहे त्याच्या बद्दल तुम्ही विचार करा, माझी चिंता करु नका. मी विरोधी पक्षातील एक लहान माणूस आहे. माझ्याबद्दल तुम्ही बोलणं हे शोभत नाही. तुम्ही मोठे नेते आहात. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहात, तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणार हे सांगा असं देखील माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

follow us