तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; मासांहार विक्री बंदीवरुन नवनाथ बन यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; मासांहार विक्री बंदीवरुन नवनाथ बन यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Navnath Ban On Aaditya Thackeray : 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयाचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोध करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर आता या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप नेते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या निर्णयाला विरोध करत आहेत. पण हे करताना त्यांनी किमान इतिहास आठवायला हवा. कारण हा निर्णय ना आज घेतला, ना सध्याच्या सरकारचा आहे. प्रत्यक्षात हा निर्णय 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता, आणि तेव्हापासून तो लागू आहे. असं नवनाथ बन म्हणाले.

नवनाथ म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मासांहार विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतले आहेत. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या निर्णयाला विरोध करत आहेत. पण हे करताना त्यांनी किमान इतिहास आठवायला हवा. कारण हा निर्णय ना आज घेतला, ना सध्याच्या सरकारचा आहे. प्रत्यक्षात हा निर्णय 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता, आणि तेव्हापासून तो लागू आहे. या नियमानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, राम नवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी महापालिकांना कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे. तेही थेट आमसभेत नगरसेवक ठराव करून. म्हणजेच हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एकमताने घेतला जातो. मजेशीर गोष्ट म्हणजे, मविआ सरकारच्या काळातही हाच निर्णय तसाच कायम ठेवण्यात आला होता. त्या वेळी मात्र या नेत्यांच्या जिभेवर कुलूप लावलं होतं.

आज मात्र राजकारणाचा बाजार मांडताना “अत्याचार” चालू आहे अशा थाटात बोलत आहेत. जरा तोंड उघडण्यापूर्वी हा निर्णय वाचून घ्या! असं नवनाथ बन यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनी आम्ही आमच्या घरात काय खायचं हे आमचं स्वातंत्र्य आहे. आम्ही निश्चित 15 ऑगस्ट रोजी नॉन व्हेज खाणार असं आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे.

चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये, यावर बंदी घालणं अयोग्य आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी टिव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा विषय असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशावेळी असा निर्णय घेतला जातो. कोकणात आपण गेलो तर प्रत्येक भाजीत सुकट टाकतात. त्यामुळे अशी बंदी घालणे योग्य नाही. भावनिक मुद्दा असेत तर त्या काळासाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात पण 15 ऑगस्ट रोजी अशी बंदी महाराष्ट्रात घालणे योग्य नाही. असं माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले. तसेच या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असेही माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.

ITR Filing 2025 : करदात्यांना दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार आयकर रिटर्न

नेमकं प्रकरण काय?

मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव महानगरपालिकेने दिले आहे तर संभाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश संभाजीनगर महापालिकेकडून देण्यात आले. महापालिकेच्या आदेशानुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने मासविक्री दुकाने आणि कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube