मांसाहार बंदी! कुणाच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा संताप, शिंदेंना ओपन चॅलेंज

Jitendra Awhad On Kalyan Dombivli Non Veg sale closed : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli) मांस अन् मासळी विक्रीवर (Non Veg sale closed) बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. आव्हाडांनी सरळ शब्दांत प्रश्न केला, लोकांनी काय खावं, काय विकावं यावर कुणाच्या बापाचं राज्य आहे का?
बहुजन समाजाचा इतिहास मांसाहारी
आव्हाड म्हणाले, बहुजन समाजाच्या DNA मध्ये मांसाहार आहे. माणसाच्या दातांची रचना पाहिली तर तो मांसाहारी असल्याचं स्पष्ट होतं. हजारो वर्षांचा इतिहास सांगतो की, आपण माकडापासून विकसित झालो, आणि दातांची रचना मांसाहारासाठीच (Maharashtra Politics) आहे. मग आज अचानक हे सर्व बंद करण्याचा तमाशा कशासाठी? यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवलीत मांस विक्रीबंदीचा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांवरही आव्हाडांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ही गायकवाड बाई कोण आहे? तिला असा आदेश काढण्याचा अधिकार कोणी दिला? शासन आहे की नाही? आयुक्तांनी बाहेर येऊन स्पष्ट भूमिका मांडावी. शासनाने जर मांस विक्रीबंदी केली, तर मग श्रीखंडपुरी खाण्याचेही आदेश आहेत का?
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
शाकाहारी विरुद्ध मांसाहारी फूट पाडण्याचा प्रयत्न
आव्हाडांनी आरोप केला की राज्यात आधी ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लीम, मराठी विरुद्ध हिंदी अशा फुटी पाडल्या, आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा संघर्ष निर्माण करण्याचा डाव आहे. मी तर ठरवलंय, त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवणार, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
पुण्यात हिंदू संघटनेच्या नावाखाली मंडळ यात्रेवर बंदी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आव्हाड म्हणाले, तुमच्या बापाच्या अंगात दम असेल तर थेट शासनाला सांगून बंदी घाला. बाबासाहेब आंबेडकर आले म्हणून आम्ही शिकलो. अन्यथा जातीनुसारच कामं करावी लागली असती आणि आमच्यातला कुणीही अधिकारी झाला नसता. त्यांनी पुढे पुण्यातील काही घटकांनी ‘फुले’ चित्रपटाला दिलेल्या विरोधाची आठवण करून दिली, हेच सनातनी मनुवादी विचार आहेत, जे महाराष्ट्राला भ्रष्ट करत असल्याचा आरोप केला.
‘वॉर 2’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू! ऋतिक आणि एनटीआरचा नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित
मिरा रोड आंदोलनाचा उल्लेख
मिरा रोड प्रकरणावर बोलताना आव्हाड म्हणाले, मी फक्त टीव्हीवर बोलणारा नाही. मिरा रोडला मी स्वतः गेलो आणि लढलो. मनसेच्या विरोधाला मी तिथे प्रत्यक्ष सामोरा गेलो. कल्याण-डोंबिवलीत पहिला ‘प्रयोग’ सरनाईक यांच्या मतदारसंघातच झाला, जिथे जैन धर्माच्या नावाने मटण-मासळी दुकानं बंद करण्यात आली, असा आरोप आव्हाडांनी केला. त्यांनी उपहासाने म्हटलं, सरनाईक यांच्या पत्नी मांसाहार सुंदर बनवतात. मी अनेकदा त्यांच्या हातचं जेवलो आहे. आता त्या बनवणं बंद करणार आहेत का? असा देखील सवाल त्यांनी विचारला आहे.
एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान
आव्हाडांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटलं, तुमच्यात हिंमत असेल तर 15 ऑगस्टच्या दिवशी मी कल्याण-डोंबिवलीत मटण-मासळी जेवणार आहे, मला अटक करून दाखवा. यावेळी आव्हाडांनी ‘लाडकी बहीण’ संकल्पनेवरही टोला लगावला. हे सगळं लाडकी बहीण फसवण्यासाठीच होतं. निवडणुकीनंतर कुठलीही लाडकी बहीण यांना लागत नाही, असा आरोप त्यांनी केला.