Veg-Non veg Price : फेब्रुवारीमध्ये असं काय झालं? व्हेज महाग तर नॉन-व्हेज थाळी झाली स्वस्त

Veg-Non veg Price : फेब्रुवारीमध्ये असं काय झालं? व्हेज महाग तर नॉन-व्हेज थाळी झाली स्वस्त

Veg-Non veg Price : कोणत्याही हॉटेलवर गेल्यानंतर व्हेज थाळी ही नॉनव्हेज थाळीच्या ( Veg-Non veg Price ) तुलनेत स्वस्त असते. हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये उलट झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात चक्क व्हेज थाळी महाग तर नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. यामागे नेमकं कारण काय? पाहुयात…

Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती जाणून घ्या…

क्रिसिल या रेटिंग एजन्सीने केलेल्या अभ्यासानुसार फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळी तब्बल सात टक्क्यांनी महाग झाली. तर मांसाहारी थाळी नऊ टक्क्यांनी स्वस्त झाली. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळी महाग झाली. तर पोल्ट्रीच्या किमती कमी झाल्यामुळे मांसाहारी थाळी स्वस्त झाली.

क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी, थेट पाकिस्तानशी कनेक्शन

रोटी, कांदा, टोमॅटो आणि बटाटे अशा प्रकारच्या भाज्या तांदूळ, डाळ, दही आणि कोशिंबीर अशा प्रकारच्या शाकाहारी थाळीची किंमत 27 रुपये पाच पैशांनी वाढली जी गेल्या वर्षी 25 रुपये सहा पैशांनी वाढली होती. तर सध्या कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे 29 टक्क्यांनी 38 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच तांदूळ आणि डाळी देखील महागल्यात

‘रोहित पवारांचा कारखाना जप्त’; सुप्रियाताईंचा संताप, म्हणाल्या, ‘राजकारणाची..,’

तर दुसरीकडे पोल्ट्रीच्या किमती कमी झाल्याने मांसाहारी थाळीमध्ये मात्र घट झाली आहे. मागील वर्षी 59 रुपये दोन पैशांनी वाढलेली थाळीची किंमत 54 रुपयांपर्यंत घसरली आहे. ब्रॉयलरच्या किमतीत बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावामुळे 20 टक्क्यांची घसरण झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube