‘रोहित पवारांचा कारखाना जप्त’; सुप्रियाताईंचा संताप, म्हणाल्या, ‘राजकारणाची..,’

‘रोहित पवारांचा कारखाना जप्त’; सुप्रियाताईंचा संताप, म्हणाल्या, ‘राजकारणाची..,’

Supriya Sule On ED Action : सुडाचं राजकारण इतकी खालची पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं, सुडाचं राजकारण करणं हे दुर्देव असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमदार रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई होताच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नडमधील साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

“बँडबाजा वाजलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने गडकरींना ऑफर देणे म्हणजे”.. फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादा युवक अतिशय संविधानाच्या चौकटीत राहुन भाषण करत आहे. पण भाजपकडून सुडाचं राजकारण केलं जात आहे. हे अतिशय दुर्देवी असून सुडाचं राजकारण इतकी पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं. हे फक्त अदृश्य शक्ती घर फोडा, पक्ष फोडा, काही करुन सत्तेत या. लोकांचा कल बाजूने नसेल तर एजन्सीची भीती दाखवली जाते. लोकांचा कल त्यांच्याबाजूने नसला तरी अदृश्य शक्ती ईडी सीबीआयचा वापर करुन भीती दाखवत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्यासंबंधित कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांची ईडीने मुंबईत चौकशी केली होती. त्यानंतर बारामती अॅग्रोशी निगडीत कारखाना जप्त झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान युवा आमदार ज्यांनी युवा संघर्ष यात्राकाढून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?

विधिमंडळामध्येही शेतकरी असतील महिला असतील युवक असतील बेरोजगार असतील सगळ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांवर केंद्र सरकारने ईडीमार्फत कारवाई केली आहे. विरोधकांना खच्ची करण्यासाठी ही सगळी मोहीम सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून राबवली जात आहे.

दरम्यान, रोहित पवार भाजपला अडचणीचे वाटत असल्याचेही लवांडे म्हणाले. रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार न घाबरता राज्यभर फिरत असल्याने भाजपनं सुडबुद्धीने रोहित पवारांची ईडी चौकशी केल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे. तसेच भाजपने अशा पद्धतीने यंत्रणाचा दुरुपयोग करून कारवाई केली तरी महाराष्ट्रातील जनता दिल्ली पुढं झुकणार नसल्याचे लवांडे यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज