‘मांसाहारी लोक देशद्रोही…’; पुण्यात मेनका गांधींचं धक्कादायक विधान
Maneka Gandhi Statement Non Vegetarians Traitors To Contry : भारताच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पर्यावरणीय चिंता आणि मांसाहारी अन्नावर बोलताना मेनका गांधी यांनी दावा केलाय की मांसाहारी अन्न (Non Vegetarians) खाणारे “देशद्रोही” आहेत. वन्यजीव आणि पर्यावरणावर (Traitors) त्याचा हानिकारक परिणाम होत आहे. त्यामुळे मेनका गांधी यांनी लोकांना शाकाहार स्वीकारण्याचं आवाहन केलंय.
मोठी बातमी! बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणीच बरखास्त; निर्णयामागचं कारण काय?
सोशल रिस्पॉन्सबिलीटी ग्रुपच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेखर मुंदडा, वनिता बोराडे, निवृत्त कर्नल डॉ. नवाज शरीफ, आशिष गोस्वामी, विजय वरुडकर आणि डी. भास्कर हे उपस्थित होते. मनेका गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता शाकाहारी विरूद्ध मांसाहारी हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजितदादा म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो की..”
मेनका गांधी म्हणाल्या की, ‘जगातील सर्वाधिक जंगलतोड भारतात होत आहे. गेल्या 33 वर्षांत 66 हेक्टर वनजमिनी नष्ट झाली आहे. बदलती जीवनशैली आणि वाढता मांसाहार वन्य प्राण्यांसाठी हानिकारक आहे. म्हणूनच लोकांनी मांसाहारी अन्न खाणे बंद करावे. मांसाहारी अन्न खाणारे लोक या देशाचे देशद्रोही आहेत. वन्य प्राण्यांच्या चामड्यापासून बनवलेले पदार्थ, प्राण्यांची तस्करी, शिकार आणि मांस निर्यात यामुळे जंगलतोड होत आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. गांधींनी असा युक्तिवाद केला की, प्राणी त्यांचे अधिवास गमावत असताना, त्यांना मानवी वस्तीत प्रवेश करण्यास भाग पाडले जाते. वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी मांसाहारी अन्न सेवन आणि मांस निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी देखील मनेका गांधींनी केलीय.
मेनका गांधींनी देशातील प्राणीसंग्रहालयांच्या स्थितीवरही भाष्य केलंय. त्यांनी निदर्शनास आणून दिलंय की, या प्राणीसंग्रहालयांमध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी असले तरी, कर्मचाऱ्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी अनेकदा योग्य प्रशिक्षण दिले जात नाही. परिणामी, प्राण्यांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचं देखील मनेका गांधींनी स्पष्ट केलंय.