Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ

Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ

Maneka Gandhi : भाजप खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्या एका धक्कादायक वक्तव्याने इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) संस्था वादात अडकली आहे. खासदार गांधी यांनी इस्कॉनवर (ISKCON) हल्लाबोल कर या संस्थेला सर्वात मोठी धोकेबाज संघटना म्हटले. तसेच इस्कॉन त्यांच्या गोशाळेतील गाई कसायांना विकत असल्याचा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी केला. दरम्यान, हा आरोप इस्कॉनने फेटाळला असून अशा आरोपांना खोट आणि बिनबुडाचे म्हटले आहे.

Boys 4 Song: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरने गायलं गाण; ‘बॉईज ४’चं पहिले सॉन्ग रिलीज

मनेका गांधी (Maneka Gandhi) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या इस्कॉनवर टीका करताना दिसत आहेत. भारतात आजमितीस सर्वाधिक धोकेबाज संघटना इस्कॉन आहे. त्यांनी गोशाळा सुरू केल्या. या गोशाळा चालविण्यासाठी सरकारकडून अगणित फायदे मिळतात. जमिनीही दिल्या जातात.

नुकताच आंध्र प्रदेशातील अनंतपूर गोशाळेचा दौरा केला. तिथे एकही वासरू दिसले नाही. एकही साधी गाय दिसली नाही. सगळ्याच दुभत्या गायी होत्या. याचाच अर्थ असा की सर्व गाई विकल्या गेल्या. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्ण करत फिरत असतात. दूध-दूध म्हणत असतात. पण, जेवढ्या गायी यांनी खाटकांना विकल्या असतील तितक्या कदाचित इतर कुणीच विकल्या नसतील. जर हे असं करू शकतात तर इतरांबद्दल काय बोलायचं असा सवाल गांधी (Maneka Gandhi) यांनी केला. इस्कॉन त्यांच्या सगळ्या गाई कसायांना विकत आहे. कुणीच इतक्या गाई कसायांना विकल्या नसतील जितक्या या इस्कॉनने विकल्या आहेत, असा गंभीर आरोप मनेका गांधी या व्हिडिओत करताना दिसत आहेत.

Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

इस्कॉननेही दिले सविस्तर उत्तर

या आरोपांनंतर इस्कॉनमध्ये खळबळ उडाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी सांगितले की इस्कॉन फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर गाईंचे संरक्षण आणि देखभालीत आघाडीवर आहे. आमच्या येथे गाई आणि बैलांची आयुष्यभर सेवा केली जाते. त्यांना कत्तलखान्यात विकलं जात नाही, अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर लिहीली आहे. या पोस्टसोबत त्यांनी इस्कॉनकडून जारी करण्यात आलेलं पत्रही शेअर केलं आहे. Maneka Gandhi या नावाजलेल्या वन्यजीव हक्क संरक्षण कार्यकर्त्या आहे आणि इस्कॉनच्या हितचिंतक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असा आरोप केला जाणं याचं आश्चर्य वाटत आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube