Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut Criticized Eknath Shinde : राज्यात पावसाने कहर केला. नागपुरात (Nagpur Rain) तर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. लोकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या असताना नागपूर पाण्यात असताना सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला.

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सीएम एकनाथ शिंदे, नागपूर पूर, राज्यातील दुष्काळ, महिला आरक्षण विधेयक या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राऊत पुढे म्हणाले, मुंबई, नागपुरात काय घडत नाही. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या घरी कॅमेरे फिरत आहेत. हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड जमा होतंय. तुम्ही परदेश दौऱ्यावर कोणती गुंतवणूक आणायला चालला आहात. जी गुंतवणूक गुजरातमध्ये गेली ती पहिली आणा. मुंबईहून मोठमोठी कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्था अहमदाबादला चालली आहेत ते आणा त्यानंतर परदेशात जा. परदेश दौरा रद्द केला, भीती असायला हवी. ही भीती आदित्य ठाकरेंची आहे. शिवसेनेची आहे. जनतेची आहे. ती असायलाच हवी असे राऊत म्हणाले.

मोठी बातमी : माजी खासदार विजय दर्डांसह पुत्राला दिलासा; कोळसा घोटाळा प्रकरणातील शिक्षेला स्थगिती

नागपूर पाण्यात बुडालं आहे. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यानंतर कळालं का? महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत? उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावं याचा नैतिक भान असायला हवं. कलाकार येतात आणि जातात तिथे दुसरा मुख्यमंत्री असतील तर ते तिकडे जाऊन नाचतील. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूर मध्ये जाऊन लोकांचं दुःख हरण करायला हवं, अशी टीका राऊत यांनी केली.

राज्यातील शेतकरी अस्वस्थ, व्यापारीही अस्वस्थ

महाराष्ट्राचे दुर्दैव आहे संबंधित खात्याचे मंत्री मुंबईत येऊन गेले. या राज्याला कृषिमंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? शंभर कोटींच्यावर कांदा पडून आहे. कांदा व्यापारी अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. तुमचे मंत्री आले आणि गेले त्यांनी दिल्लीत बोलावलं प्रश्न महाराष्ट्रात मंत्री आले आणि काय म्हणाले दिल्लीत या.

Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube