Boys 4 Song: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरने गायलं गाण; ‘बॉईज ४’चं पहिले गाणे रिलीज

Boys 4 Song: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरने गायलं गाण; ‘बॉईज ४’चं पहिले गाणे रिलीज

Boys 4 Movie: बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर (Box office) धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. आता ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर हे त्रिकुट पुन्हा चाहत्यांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ नंतर आता  ‘बॉईज ४’ (Boys 4 Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमाच्या टीझरनंतर आता पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या गाण्यामध्ये खुद्द ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर यांनी गायलं आहे. या गाण्यात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे यांनी अभिनयावर आता गायन क्षेत्रामध्ये देखील एक अनोखा  पाऊल टाकल्याचे बघायला मिळणार आहे. त्यांच्या सिनेमाचं हे पहिलं गाणं चाहत्यांच्या पसंतीला आल्याचे बघायला मिळाले आहे.

तसेच ‘बॉईज’च्या सर्व भागांना अवघ्या महाराष्ट्रामधून प्रेम मिळत आहे. धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे त्रिकुट आता चौपट धमाल लवकरच भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमातील ‘टायटल सॉन्ग’ प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्ते यांच्यासह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले असल्याचे सांगितले जात आहे. आणि या गाण्याच्या निमित्ताने आता हे त्रिकुट गायक देखील बनल्याचे बघायला मिळत आहे.

Short And Sweet Movie: रंजक ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा स्वीट टीझर प्रदर्शित

आता ‘बॅाईज ४’ मध्येही कलाकारांची जबरदस्त फळी दिसत आहे. आता यात कोणाच्या काय व्यक्तिरेखा आहेत आणि कोण काय काय धमाल करणार आहेत, हे मात्र २० ॲाक्टोबरला ‘बॅाईज’ आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांनी सांगितले आहे की, ‘’ आतापर्यंत धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मस्ती तुम्ही पाहिली आता ही मस्ती आणखी वाढणार आहे. ‘बॅाईज ४’ मल्टीस्टारर फिल्म आहे त्यामुळे यांची मस्तीही मल्टीपल होणार आहे. शाळा, ज्युनियर कॅालेज नंतरचा ‘बॅाईज’चा हा डिग्रीचा प्रवास सुरू होणार आहे. या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube