ओयोमध्ये जाण्यास आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही, ‘अशी’ मिळणार एन्ट्री

ओयोमध्ये जाण्यास आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही, ‘अशी’ मिळणार एन्ट्री

No need to carry Aadhaar card to enter hotel or OYO : आतापर्यंत ओयो (OYO) किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. अशा लोकांसाठी आता महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar card) सोबत ठेवण्याची गरज नाही. कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

नवीन आधार अ‍ॅप आलंय. यामुळे ओळख पडताळणी सोपे झालंय. तुमचे काम रुग्णालये, परीक्षा केंद्रे किंवा दुकानांमध्ये QR कोड स्कॅन करून केले जाईल. याशिवाय, हॉटेलमध्येही ही पद्धत (New Aadhaar App) फायदेशीर ठरणार आहे. UIDAI आणि सरकारने नवीन डिजिटल आधार अ‍ॅप लाँच केलंय. पण सध्या त्याचे अधिकृत नाव उघड झालेलं नाही. ज्यामुळे भारत डिजिटल इंडियाच्या दिशेने एक पाऊल पुढे गेलाय. या अ‍ॅपद्वारे तुमची ओळख काही सेकंदात कळू शकते. हे UPI द्वारे पेमेंट केल्याप्रमाणे काम करेल.

Andhra Pradesh : फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, 8 कामगारांचा भाजून मृत्यू तर 7 कर्मचारी गंभीर जखमी

हे तंत्रज्ञान कसे काम करेल?
रिपोर्ट्सनुसार हे mAadhaar अॅपचे अपडेटेड व्हर्जन असू शकते. या अ‍ॅपचा इंटरफेस आणि तंत्र खूपच सोपे असेल. यासाठी प्रथम स्मार्टफोनमध्ये अॅप उघडावे लागेल. यानंतर क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. ते ओळख पडताळेल. बनावट आधार वापराच्या घटना रोखण्यासाठी UIDAI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणखी वाढेल.

एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?

नवीन आधार अ‍ॅपचे फायदे
लवकरच तुम्हाला हॉटेल, दुकान, बँक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आधार कार्डची फोटो प्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. फक्त QR कोड स्कॅन करून ओळख पडताळली जाईल. यामुळे प्रक्रिया जलद होते आणि सुरक्षितता अधिक असते.

या अ‍ॅपनंतर पडताळणीसाठी फिंगरप्रिंट द्यावे लागणार नाही किंवा आयरिस स्कॅन करावे लागणार नाही. पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल. आधार कार्डची फोटो प्रत सोबत ठेवण्यात सुरक्षिततेचा धोका आहे. कधीकधी कोणीतरी प्रतीचा गैरवापर करतो. पण आता प्रिंटआउट किंवा मूळ आधार ठेवण्याची गरज नाही. आता आधारची प्रत शेअर करण्याचा ताण संपेल. संपूर्ण माहिती अॅपमध्ये सेव्ह केली जाईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube