ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वाचा, काय आहे नक्की ‘ते’ प्रकरण?

FIR Against Ritesh Agrawal : ओयो (OYO)चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरोधात २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जयपूरमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक हॉटेल मालकांनी ओयोवर फेक रूम बुकिंगद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. यामुळे हॉटेलांना जीएसटी विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा कर, दंड आणि व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हॉटेल फेडरेशन ऑफ राजस्थानचे अध्यक्ष हुसैन खान यांनी ही समस्या गंभीर असल्याचं सांगितलं. जयपूरच्या आदर्शनगर पोलीस ठाण्यात रितेश अग्रवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. याशिवाय, जोधपूरमध्येही गेल्या सहा महिन्यांत १० हॉटेल मालकांना जीएसटी नोटीस मिळाली आहे. ओयोवर बुकिंग आणि नंतर रद्दीकरणाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे हॉटेलांना जीएसटी भरावा लागत आहे.
मोठी बातमी! पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, बेल्जियम पोलिसांची कारवाई
ओयोवर बनावट बुकिंगच्या नावाखाली पैसे कमावल्याचा आरोप आहे. त्याचे मालक रितेश अग्रवाल यांच्याविरुद्ध 22 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील जयपूरमधील काही हॉटेल मालकांनी ओयोवर फसवणुकीचा आरोप केला आहे. ओयोने त्यांच्या हॉटेल्समध्ये बनावट बुकिंग करून पैसे कमावल्याचा आरोप आहे.