“भीक नाही हक्काचे पैसे मागतोय”, अजितदादांवर मंत्री सरनाईक नाराज; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा वाद वाढला..

“भीक नाही हक्काचे पैसे मागतोय”, अजितदादांवर मंत्री सरनाईक नाराज; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा वाद वाढला..

Pratap Sarnaik Press Conference : राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या (Pratap Sarnaik) एका वक्तव्याने महायुती सरकारमधील धुसफूस पु्न्हा समोर आली आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाही. आम्ही पाठवलेली फाईल वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाइल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहचत नाही. हे योग्य नाही अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक बोलत होते.

सरनाईक पुढे म्हणाले, एसटी महामंडळ अतिरिक्त पैसे मागत नाही. आम्ही तर आमच्या हक्काचे पैसे मागतोय. आम्ही भीक मागत नाही. पीएफचे पैसे वापरू शकत नाही. ते पैसे वापरले तर आम्हाला तुरुंगात जावं लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचाही पगार वेळेत झाला पाहीजे. आम्ही पाठवलेली फाईल ही वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाइल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहचत नाही. हे योग्य नाही.

आता वित्त विभागातच जाऊन बसणार

अजितदादांनी मला बोलावून घेतले होते त्यांना मी त्यावेळी वास्तव परिस्थिती सांगितली होती. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार ७ तारखेला झालेच पाहिजेत. मीच आता दर महिन्याला ५ तारखेला वित्त विभागात जाऊन बसणार आहे. त्यांना पण कळू दे की मंत्र्याला येथे यावं लागतं अशा शब्दांत त्यांनी वित्त विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

दोन वर्षात एसटीला कॉर्पोरेट लूक देणार

दोन वर्षात मी एसटीला कॉर्पोरेट लूक देणार आहे पण हा लूक देत असताना कधी छप्पर उडाले असे प्रकार होणार नाहीत. आम्ही स्क्रॅपिंग पॅालिसी आणखी आहे. आमच्या दोन ते अडीच हजार बसेस या स्क्रॅपमध्ये काढल्या. आता आम्ही ३ हजार बसेसची निविदा काढणार आहोत. पुढील चार वर्षात ५ हजार बसेस कशा येतील हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही ग्रामीण तालुका आणि शहरी भागातील डेपो विकसित करणार आहोत.

सुरक्षा महत्वाची आहे. नव्या सर्व बसेसमध्ये पॅनिक बटन, सीसीटीव्ही, आणि जीपीएस यंत्रणा लावून द्यावी लागणार आहे. जर आम्ही बसमध्ये यंत्रणा कार्यान्वित केली तर त्याचा खर्च आम्ही कंपनीकडून घेऊ. पार्सलसाठी जागा वाढविणार आहोत. एसटीचे उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देणार आहो. त्यांना प्यायला थंड आणि आंघोळीला गरम पाणी देणार आहोत. राज्यातील सगळ्या बस डेपोत या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला, शिंदे गटात फिलगुड!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube