एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?

एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?

Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप नेते देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर होते. तेव्हा महायुतीचे तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार अन् एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

यावेळी अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी जेवणासाठी गेले असल्याची देखील माहिती मिळतेय. तर शाहांच्या कोर्टात रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याचं दिसतंय. भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना झाले (Maharashtra Politics) आहेत. गोगावलेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. फोनवर त्यांना मुंबईला येण्यासाठी सांगितलं. तर पक्षाच्या कामासाठी शिंदे यांनी बोलावल्याचं गोगावले यांनी यावर म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील अन् आजोबांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करा, रईस शेख यांचे CM फडणवीसांना पत्र

अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात रायगडवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी अमित शाह यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनातील नाराजी बोलून दाखवली. त्यांनी रायगडचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गंभीर चर्चा झाली. चर्चेनंतर एकनाथ शिंद यांनी भरत गोगावलेंना भेटण्यासाठी निरोप पाठवल्याचं समजतंय. भरत गोगावले यांनी रायगडमधील सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत शिंदेंचा निरोप आल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली.

अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात काल आत बंद दाराआड चर्चा झालीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यानंतर आता भरत गोगावले यांना एकनाथ शिंदेंचा फोन आलाय. भएक कार्यक्रम अर्धवट सोडूनच भरत गोगावले मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं समजतंय. भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.

रत्नागिरीला भाजपचा बालेकिल्ला बनवणार; मंत्री राणेंच्या मनात नक्की काय?

अमित शाहांच्या रायगड दौऱ्यानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तब्बल 4 महिन्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आता एकनाथ शिंदे भरत गोगावले यांची समजूत काढणार की रायगडचे पालकमंत्रिपद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube