पाइपवरुन चढायचा अन् चोरी करायचा; 12 तासांच्या आत मुंबईच्या ‘स्पायडर मॅन’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 36 लाखांचं सोनं…

Police Arrested Spider Thief Climbing Pipe Seized Gold 37 Lakh Robbery : आरामदायी जीवन जगण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील, हे काही सांगता येत नाही. मुंबईत अशाच एका स्पायडर मॅन चोराच्या (Spider Thief) पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Mumbai Crime News) आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम येथील रामबाग लेन येथील अॅडव्हांट प्लाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडर-मॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या हुशार चोराला मालाड पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली. 36 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून (Mumbai Crime) हा धूर्त चोर पळून गेला होता. 10 एप्रिल रोजी मालाड पोलिसांनी चोरीचे प्रकरण गांभीर्याने घेतले. गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
100 हून अधिक सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि स्रोतांच्या मदतीने, मालाड पोलिसांना असे आढळून आले की, आरोपी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर एका झोपडीत राहत होता. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर 1 किलोमीटर धावत असताना मालाड (Crime News) पोलिसांनी सापळा रचला आणि फिल्मी शैलीत आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे (Robbery) नाव आहे. जो अंधेरी पश्चिमेचा रहिवासी आहे. आरोपींकडून 36 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आले.
तुमचा स्मार्टफोन किती फास्ट अन् पॉवरफुल? मिनिटांत मिळेल उत्तर; जाणून घ्या Step-by-Step
मालाड पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींविरुद्ध चोरीचे 30 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तो हुशार चोर चोरी करायचा आणि काही मिनिटांतच पळून जायचा. मालाड पोलीस आरोपीकडून मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने कुठे कुठे चोरी केली आहे? या चोरीत त्याच्यासोबत आणखी किती लोकांचा सहभाग आहे? याचा तपास करत आहेत.
गोरेगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत यांनी सांगितलं की, रामबाग लेन येथील बिल्डिंगमध्ये घरफोडी झाली होती. तक्रार नोंदविल्यावर आम्ही घटनास्थळा जावून पाहणी केली होती. त्यानंतर आम्ही टीमला अॅक्टीव करून डिरेक्शन दिले होते. सराईत गुन्हेगाराचं काम असावं, असं आम्हाला वाटतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला आरोपीचे ब्लर इमेज मिळाले होते. जवळपास शंभर सीसीटीव्ही आम्ही पाहिले. संतोष चौधरी या आरोपीची ओळख पटली. उपलब्ध माहितीवरून आम्ही बारा तासांच्या आत ताब्यात घेतलं. त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्वच्या सर्व मालमत्ता परत मिळविण्यात आम्हाला यश आलंय.