Thief CCTV Video: ‘दबक्या पावलांनी बेडरुममध्ये शिरला अन्…’, मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी

Thief CCTV Video: ‘दबक्या पावलांनी बेडरुममध्ये शिरला अन्…’, मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी

Swapna Waghmare Joshi House Thief: मराठी चित्रपट आणि टीव्हीच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी (Swapna Waghmare Joshi) यांच्या सहाव्या मजल्यावरील घरात ड्रेनेज पाईपच्या साहाय्याने चोरट्याने प्रवेश केला. (Mumbai Crime News) मध्यरात्री, सर्वजण झोपलेले (Thief CCTV Video) असताना, चोर टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये त्यांच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढला आणि खिडकीतून घरात प्रवेश केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashoke Pandit (@ashokepandit1)


चोरट्याची प्रत्येक हालचाल सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, अंधेरी पश्चिम येथील सब टीव्ही लेन, शबरी हॉटेलजवळ विंडसर बी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जोशी यांचा 3BHK फ्लॅट आहे. 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3 च्या सुमारास फ्रेंच स्लाइडिंग खिडकीतून चोरट्याने स्वप्ना यांच्या घरात प्रवेश केला आणि हॉलमधील पैसे किंवा मौल्यवान वस्तू शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो जोशी यांच्या आईच्या खोलीच्या दिशेने गेला आणि दरवाजा उघडला.

‘चोराने दरवाजा थोडासा उघडला, पण…’

चोराने नुकतचं दार थोडेसे उघडून बेडरूममध्ये डोकावले, तिथे जोशींची आई बेडवर झोपली होती आणि केअरटेकर जमिनीवर झोपला होता. नंतर, त्याने दुसऱ्या बेडरूममध्ये पाहिले, परंतु तेथे एक कुत्रा असल्यामुळे तो आत जाऊ शकला नाही. म्हणून, तो स्वयंपाकघरात गेला आणि नंतर मंदिराच्या खोलीत शोधू लागला.

ही घटना पहाटे 3 ते 3.30 च्या दरम्यान घडली

त्यानंतर तो जोशी यांची मुलगी सौमिता हिच्या खोलीत गेला, जिथे ती आणि तिचा पती झोपले होते. चोरट्याने त्या खोलीत प्रवेश करून सौमिताच्या पर्समधील 6 हजार रुपये चोरून नेले.

पाळीव मांजरीने घर वाचवले

पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या पाळीव मांजरीने जोशी यांचा जावई देवन यांना उठवले. देवन हे पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले असता त्यांना संशय आला म्हणून त्यांनी पुन्हा हॉलमध्ये येऊन चोरट्याला पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र काही सेकंदातच चोर खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. चोर निशस्त्र होता. ही संपूर्ण घटना जोशी यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Jagun Ghe Zara: बाप्पाचे दर्शन घेत ‘जगून घे जरा’ चित्रपटाची घोषणा

आंबोली पोलिसांत तक्रार दाखल

या घटनेनंतर जोशी यांनी आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. जोशी यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली, त्यानंतर आंबोली पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 305 (चोरी), 331(3) आणि 331(4) (जबरदस्तीने प्रवेश करणे किंवा घर तोडणे) अंतर्गत 26 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube