Ahmednagar Crime : नगरचे बिहार बनतेय! पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाला दांडक्याने मारहाण

Ahmednagar Crime : नगरचे बिहार बनतेय! पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाला दांडक्याने मारहाण

Ahmednagar Crime Youngster beaten in Police Station Precincts : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात गुन्हगारीचा ( Crime ) आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे. यातच शहरातील मुख्य बाजारपेठेत एका वाहनधारकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने भरचौकात दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याने संबंधित वाहनचालकाला मारहाण ( Youngster beaten ) केली त्यानंतर त्याच्या वाहनाची देखील तोडफोड केली. भरचौकात घडलेल्या या घटनेने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे खुलेआमपणे अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली उडवत असल्याने नगरचे येत्या काळात बिहार होते की काय असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहे.

शिर्डीत ‘वंचित’ ठरणार गेमचेंजर; घसरलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक कुणाला मारक ठरणार?

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू रिक्षा चालक आपले वाहन घेऊन रोडवरून जात असताना दिसून येत आहे. त्याच्यापाठोपाठ दोन दुचाकीवर काही तरुण चेहऱ्याला रुमाल बांधून आले. त्यांनी रिक्षा चालकाच्या वाहनाला आपल्या दुचाकी आडव्या लावल्या व संबंधित वाहनचालकाला वाहनातून बाहेर ओढून काढले.

Sunil Chhetri कडून निवृत्तीची घोषणा; कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार

काही समजण्याच्या आतच तरुणांच्या टोळक्याने वाहनचालकाला रस्त्यावर फरफटत नेट दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहनचालकाने याला विरोध केला मात्र टोळक्याने त्याचे हात पकडत त्याला मारहाण केली. संबंधित वाहनचालक तेथून पळून गेला असता टोळक्याने त्या रिक्षाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रिक्षाचा काचा फोडून हल्लेखोर घटनास्थळाहून फरार झाले.

शहराची कायदा- सुव्यवस्था वाऱ्यावर

त्यांनतर रिक्षा चालक घटनास्थळी आला त्याने आपल्या रिक्षाची पाहणी केली. धक्कादायक बाब म्हणजे नगर शहरातील कापड बाजारातील मुख्य चौकात एका हॉटेल समोर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी कोतवाली पोलीस दाखल झाले आहे. दरम्यान घटना का व कोणत्या कारणामुळे घडली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही आहे. मात्र अशा घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज