Sunil Chhetri कडून निवृत्तीची घोषणा; कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार

Sunil Chhetri कडून निवृत्तीची घोषणा; कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार

Indian Football Captain Sunil Chhetri Announces Retirement : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. कारण भारतीय फुटबॉल ( Indian Football Captain ) संघातून दिग्गज खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्री ( Sunil Chhetri ) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर ( Announces Retirement) केलं आहे.

Bhushan Kadu: ‘हास्यजत्रा शोची मनाविरुद्ध एक्झिट’, अभिनेत्याने सांगितला खडतर काळातील प्रसंग

आपली निवृत्ती जाहीर करताना त्यांनी सांगितलं की, 6 जूनला फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणार नाही. भारताचा हा सामना कुवेत बरोबर असणार आहे. सुनील छेत्री यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं. तर त्याने भारतासाठी 150 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 94 गोल केले आहेत. यासाठी त्याचं नाव फुटबॉल सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणारा टॉप 5 खेळाडूंमध्ये घेतलं जातं.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल

तर आज गुरुवारी सुनील छेत्री याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, एक दिवस असा होता. जो मी कधीच विसरू शकत नाही. मला तो दिवस कायम आठवतो. ज्या दिवशी मी पहिल्यांदा देशासाठी खेळलो होतो. ते अविश्वसनीय होतं. राष्ट्रीय टीमचे कोच सुखी सर एक दिवस सकाळी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की, आजपासून तू तुझ्या करिअरला सुरुवात करत आहे. त्यावेळी माझ्या भावना काय होत्या. हे मी शब्दात सांगू शकत नाही. तेव्हा मी लगेचच माझी जर्सी घेतली. त्यावर परफ्युम मारला. पण मला आजही आठवत नाही. मी तसं का केलं? अशी आपली एक भावनिक आठवण शेअर करत सुनील छेत्री याने आपली निवृत्ती जाहीर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज