SAFF Cup Football Match: सुनील छेत्रीने साधली हॅट्ट्रिक, भारताने पाकिस्तानचा केला दारुण पराभव
SAFF Cup Football Match: क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल… क्रीडा विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF कप) या फुटबॉल स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
बुधवारी (21 जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सॅफ चषकाच्या अ गटात सामना झाला. स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला सुनील छेत्री त्यांने हॅट्ट्रिक घेऊन भारताचा विजय सोपा केला. (sunil-chhetri-hattrick-as-india-beat-pakistan-4-0-in-saff-football-tournament-live-update-ind-vs-pak-football-match-udanta-singh-kumam)
सुनीलने 10व्या मिनिटाला पहिला गोल केला
10व्या मिनिटाला सुनीलने सामन्यातील पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. इथून पाकिस्तान संघाला पुनरागमन करण्याची संधी होती, पण सामन्याच्या 16व्या मिनिटाला सुनीलने दुसरा गोल करत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. हा दुसरा गोल पेनल्टीतून झाला.
Was there ever any doubt that @chetrisunil11 would step up to the occasion?💙🙌🏽🤩#SAFFChampionship2023 🏆 #INDPAK #IndianFootball ⚽️ #BlueTigers 🐯 pic.twitter.com/E9aECGLuGO
— Indian Football Team (@IndianFootball) June 21, 2023
इथून परतणे पाकिस्तानसाठी खूप अवघड होते. त्याचे दडपण संपूर्ण संघावरही दिसून येत होते. सामन्याच्या पूर्वार्धात पर्यंत पाकिस्तान संघ या दबावातून बाहेर पडू शकला नाही. तर टीम इंडिया पूर्णपणे वरचढ दिसत होती.पूर्वार्ध टीम इंडियाच्या नावावर होता, 2-0 अशी आघाडी कायम होती.
टीम इंडिया 4-2-3-1 कॉम्बिनेशनसह मैदानात उतरली
सामन्याच्या उत्तरार्धात पाकिस्तानने पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण टीम इंडियाच्या मजबूत लाइनअपसमोर ती पूर्णपणे कमकुवत दिसत होती.या सामन्यात भारतीय संघ 4-2-3-1 च्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरली होती. तर पाकिस्तानचा संघ ५-४-१ कॉम्बिनेशनसह मैदानात उतरला होता.
IND vs PAK फुटबॉल: एकटा भारतीय प्रशिक्षक भिडला पाकिस्तानी खेळाडूंशी, व्हिडिओ व्हायरल
उत्तरार्धात सुनीलने पुन्हा आपली चुणूक दाखवली
पाकिस्तान संघाने पुनरागमन करणे तर दूरची गोष्ट, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने आणखी दोन गोल केले. सामन्याच्या उत्तरार्धात सुनीलने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले. सामन्याच्या 74व्या मिनिटाला पाकिस्तान संघाच्या चुकीचा फायदा उठवत त्याने पेनल्टीवर तिसरा गोल केला. अशाप्रकारे सुनीलने या सामन्यात आपली हॅटट्रिकही पूर्ण केली. पाकिस्तानला येथून परतणे अशक्य झाले होते.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू उदांता सिंग कुमामने राहिलेली कसरपूर्ण केली . त्याने 81 व्या मिनिटाला गोल करून स्कोर 4 – 0 केला. अशा प्रकारे या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला.