Pune Crime: गोऱ्हे बुद्रुकमध्ये 3 तरुणांवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Crime: गोऱ्हे बुद्रुकमध्ये 3 तरुणांवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Crime: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime) तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Pune Police) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्ला नेमका का करण्यात आला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील बस स्टॉपजवळ दहा ते पंधरा गुंड हातात तलवारी व कोयते घेऊन थांबले होते. दुचाकीवरुन आलेल्या गोऱ्हे बुद्रुक येथील तीन तरुणांवर त्यांनी अचानक हल्ला केला. तिनही तरुण तेथून पळाल्याने थोडक्यात बचावले आहेत मात्र मागून हत्याराचे घाव बसल्याने खोल जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी दुचाकीवरही दगड टाकून मोडतोड केली आहे.

Laapataa Ladies Special Offer: किरण रावने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज गिफ्ट…

तोंडाला रुमाल बांधून आलेले हल्लेखोर पसार झाले असून अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास हवेली पोलीस करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज