Pune Crime : धक्कादायक! राख अंगावर पाडल्याचं निमित्त अन् अंगावर सोडला थेट पिटबुल डॉग
Pune Crime : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे (Pune Crime ) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये पर्वती येथील लक्ष्मीनगरमधील शाहू वसाहतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी शेकोटी करत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून, एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून त्याला चावा घेण्यास सांगितले. या कुत्र्याने संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
Uday Samant : ठाकरेंच्या व्यासपीठावरचे काही दिवसांत शिंदेंचे नेतृत्व स्विकारतील; सामंतांचा दावा
या घटनेनंतर याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये स्वतः पीडीत तरूण तन्वीर रमजान सय्यद (वय १८ वर्षे) यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य नितीन आंदेकर (वय २५ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर या घटनेमध्ये तन्वीर सय्यद गंभीर जखमी झाला आहेत.
नेमकी घटना काय?
पर्वती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर आणि त्यांचे मित्र घराजवळच शेकोटी करत बसलेले होते. त्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर राखेची टोपली ठेवण्यात आलेली होती. ही राखीची टोपली आरोपी आदित्य आंदेकरच्या अंगावर पडली. त्यामुळे चिडलेल्या आदित्य याने याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. ही टोपली तन्वीर यानेच टाकली असा समज त्याने करून घेतला.
नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा…अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!
त्याने तन्वीरला शिवीगाळ करून गचांडी पकडत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे पिटबुल जातीचे कुत्रे यावेळी त्याच्या सोबत होते. या कुत्र्याला ‘सारा धर याला’ असे म्हणत त्याच्या अंगावर सोडले. या कुत्र्याने फिर्यादीच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे अगदी शुल्लक कारणामुळे हा घटना घडली आहे. मात्र यामध्ये तन्वीर सय्यद हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.