शिर्डीत ‘वंचित’ ठरणार गेमचेंजर; घसरलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक कुणाला मारक ठरणार?

शिर्डीत ‘वंचित’ ठरणार गेमचेंजर; घसरलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक कुणाला मारक ठरणार?

प्रविण सुरवसे, लेट्स अप मराठी…

Lok Sabha Election VBA will be Gamechanger in Shirdi : शिर्डी लोकसभा मतदार संघात ( Lok Sabha Election ) चौथ्या टप्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र यंदा शिर्डीमध्ये ( Shirdi ) सुरुवातीपासून दुरंगी असलेली लढत अखेरच्या टप्प्यात तिरंगी झाली. शिवसेनेच्या दोन गटामध्ये असलेली हि निवडणुक वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने तिरंगी झाली. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर शिर्डीमधील राजकारण देखील बदलले आहे. यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का वाढता असेल असा अंदाज बांधला जात होता, मात्र यंदाच्या निवडणुकीत काहीसा मतदानाचा टक्का घसरला आहे. निवडणुकीमध्ये घसरलेला हा टक्का कोणाला तारणार तर कोणाला मारक ठरणार हे मात्र निकालाच्या दिवशी कळेल, मात्र यंदा प्रस्थापितांना धक्का बसत नवा बदल दिसून येणार की ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डीमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकणार हे येणार काळच ठरवेल. तत्पूर्वी कोण होते उमेदवार व कोणाची ताकद किती याबाबत आपण जाणून घेऊ…

Sunil Chhetri कडून निवृत्तीची घोषणा; कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार

दुरंगी लढत वंचितमुळे तिरंगी

देशासह राज्यात यंदा लोकसभा निवडणूक चांगलीच गाजू राहिली आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान झाले. शिर्डीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून तिसऱ्यांदा सदाशिवराव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली. शिर्डीमध्ये सेनेच्या दोन शिलेदारांमध्ये थेट लढत होणार अशी चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीकडून वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. तर याठिकाणी काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र असे न झाल्याने गेली 16 वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाला रामराम ठोकत वंचितमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच वंचितकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली अन दुरंगी लढत वंचितमुळे तिरंगी झाली.

Bhushan Kadu: ‘हास्यजत्रा शोची मनाविरुद्ध एक्झिट’, अभिनेत्याने सांगितला खडतर काळातील प्रसंग

मतदानाचा टक्का घसरला

शिर्डीमध्ये यंदाच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये 16 लाख 77 हजार 335 मतदार होते. यापैकी 10 लाख 57 हजार 298 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 6 लाख 20 हजार 37 नागरिक मतदानापासून वंचित राहिले. मतदानाची टक्केवारी पहिली असता ती 63 टक्के एवढी राहिली. मात्र 2019 ला याच मतदार संघामध्ये 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. याचाच अर्थ असा की यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. मतदानाचा टक्का घसरला असल्याने याचा फायदा नेमका कोणाला होणार तर कोणाला याचा फटका बसणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होईलच…

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल


संगमनेरमध्ये सर्वाधिक तर अकोल्यात कमी

शिर्डीमध्ये 63 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले. यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर आकडेवारीनुसार संगमनेरमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर दुसरीकडे अकोले जो दुर्गम भाग म्हणून पाहिला जातो याठिकाणी 60 टक्क्यांचा आकडा देखील गाठता आला नाही. संगमनेरमध्ये 2 लाख 79 हजार 791 मतदारांपॆकी 1 लाख 84 हजाराहून अधिकांनी मतदानाचा हक्क बजावला . याची टक्केवारी पहिली असता ती सर्वाधिक 65.77 टक्के एवढी राहिली तर अकोलेमध्ये 2 लाख 60 हजार 686 मतदारांपैकी 1 लाख 55 हजार 930 मतदारांनी मतदान केले. जे की 59 .82 टक्के एवढे राहिले. तर श्रीरामपूरमध्ये 64 टक्के, शिर्डीमध्ये 63.77, नेवाश्यात 63.29 तर कोपरगावात 61 टक्के मतदान झाले.

Box Office: श्रीकांतची सहाव्या दिवशी बंपर सुरुवात; मोडला ’12वी फेल’च्या कमाईचा रेकॉर्ड

थोरातांची ताकद वाकचौरेंना तारणार का?

महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली. वाकचौरेंच्या विजयाची धुरा शिवसैनिकांसोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर होती. यामुळे अनेक सभा घेत थोरातांनी वाकचौरेंना बळ दिले. संगमनेरमध्ये झालेल्या जंगी सभा पाहता सर्वाधिक मतदान या तालुक्यात झाले. मात्र गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या रुपवते यांनी देखील संगमनेरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे मतदानाचा वाढता टक्का हा वाकचौरे यांच्यासाठी पोषक राहणार की रुपवते यांना याचा फायदा होणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. संगमनेरपाठोपाठ श्रीरामपूरमध्ये मतदान चांगले झाले. याठिकाणी वंचितने प्रकाश आंबेडकरांची सभा घेत चांगला जोर लावला आहे. तर अकोलेमध्ये मतदान कमी झाले असले तरी मात्र अकोल्याची कन्या असे म्हणत रुपवते यांनी हा तालुका चांगला पिंजून काढला होता.

रोड शो फक्त गुजराती परिसरात, अन्य भागात मोदी का गेले नाही? शरद पवारांची टीका

लोखंडेंच्या मनात कभी ख़ुशी कभी गम

गेली दोन टर्म खासदार असलेले शिवसेनेचे सदाशिवराव लोखंडे यांना महायुतीकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाकडडून वाकचौरे यांना उमेदवारी देत लोखंडे यांना शह देण्याचा डाव आखण्यात आला. मतदार संघामध्ये लोखंडे यांच्याविषयी असलेली नाराजी पाहता लोखंडेंसाठी ही निवडणूक थोडीशी कठीण ठरणार असाच अंदाज वर्तविला जात आहे. राज्याचे दिग्गज लोखंडेंसाठी मैदानात उतरले होते. तसेच लोखंडेच्या विजयाची धुरा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या खांद्यावर होती. विखे यांनी सभा घेतल्या मात्र एकाचवेळी शिर्डी व अहमदनगर याठिकाणच्या निवडणुका या पार पाडणार होत्या. यामुळे विखे यांना त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्यासाठी नगर दक्षिणेकडे लक्ष देणे देखील महत्वाचे होते, यामुळे लोखंडे यांच्यासाठी ही पडती बाजू राहिली. मात्र माविआ कडून वाकचौरे तर वंचितकडून रुपवते या मैदानात असल्याने या दोघांमध्ये मत विभक्त होऊन याचा फायदा हा लोखंडे यांना होऊ शकतो अशी चर्चा आहे.

2019 ते 2024 आकडेवारी काय सांगते

शिर्डीमध्ये 2019 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना प्रथम, काँग्रेस दुसऱ्या तर वंचित ही तिसऱ्या नंबरवर होती. शिवसेनेचे लोखंडे हे गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांनी त्यांनी पराभव केला होता, त्यावेळी वंचितने तिसरा नंबर गाठत 60 हजाराहून अधिक मते मिळवली होती. मात्र यंदा राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर दोन गट निर्माण झाले व दोन्ही गटाने आपापले उमेदवार रिंगणात उतरविले. माविआ कडून डावलण्यात आलेल्या रुपवते यांनी देखील वंचितकडून उभे राहत या निवडणुकीत चुरस निर्माण केली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेली वंचित या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे याचा फटका वाकचौरेंना बसणार की लोखंडे या संधीच सोनं करणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube