Lok Sabha Election : अमित शाहांचा मोठा दावा! म्हणाले, भाजप 270 प्लस जाणार

Lok Sabha Election : अमित शाहांचा मोठा दावा! म्हणाले, भाजप 270 प्लस जाणार

Lok Sabha Election: 400 पारचा नारा देत सत्ताधारी भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जोरदार प्रचार होताना दिसत आहे. भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवणून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील संपूर्ण देशात जाहीर सभा घेताना दिसत आहे.

आज प्रचारासाठी अमित शहा पश्चिम बंगालमध्ये होते. यावेळी त्यांनी निवडणूक निकालांबाबत मोठा दावा केला आहे. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज बाणगाव येथे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, आतापर्यंत 380 लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. या 380 जागांपैकी भाजपने 270 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवला आहे असा दावा त्यांनी यावेळी केला.

अमित शहा पुढे म्हणाले की, आम्हाला बहुमत मिळाला आहे आता आमचा लक्ष 400 पारवर आहे. यामुळे बंगालच्या जनतेला अमित शहा यांनी तीसपेक्षा जास्त जागा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की जर भाजपने राज्यात 30 पेक्षाजास्त जागा जिंकल्या तर भाजप उमेदवार शंतनू ठाकूर आणि भाजप मतुआ समाजाच्या घरोघरी जाऊन CAA अंतर्गत नागरिकत्व देणार.

TVS चा भारतीय बाजारात धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत आहे फक्त…

या सभेत बोलताना त्यांनी टीएमसीवर देखील टीका केली. अमित शहा म्हणाले, रोहिंग्या आणि बांगलादेशी हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या व्होट बँक आहेत. ममता सरकारने केंद्राच्या अर्थसहाय्यित योजनांची नावे बदलली बदलून त्या योजना राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज