4 जूननंतर शेअर बाजारात येणार तेजी! अमित शहांचं मोठं भाकीत, जाणून घ्या विश्लेषकांचं मत
Amit Shah On Share Market : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यात लोकसभेसाठी मतदार पार पडले आहे. तर 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.
यामुळे लोकसभा निवडणुकीचा आणि शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचा काही संबंध आहे का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना विचारण्यात आला होता. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे भाकीत केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान अमित शाह म्हणाले, शेअर बाजारात होणारी घसरण आणि लोकसभा निवडणुकीचा काहीच संबंध नाही. 4 जून नंतर शेअर बाजारात तेजी दिसून येणार आहे. शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी शेअर बाजार 16 वेळा कोसळला आहे, यामुळे याचा आणि निवडणुकीशी संबंध जोडला जाऊ नये. गुंतवणूकदारांनी 4 जूनपूर्वी खरेदी करा, कारण त्यानंतर बाजार वाढणारच आहे, असे भाकीतही यावेळी अमित शहा यांनी केला.
पुढे शाह म्हणाले, जेव्हा जेव्हा देशात एक स्थिर सरकार येते, तेव्हा बाजारात तेजी असते आणि यावेळी आमच्या 400 जागा येणार त्यामुळे बाजारातही तेजी पाहायला मिळेल. असं देखील अमित शाह म्हणाले.
बाजार आणि निवडणूक संबंधाबाबत PhillipCapital ने एक नोट जारी करत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत NDA ने जर 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर शेअर बाजारात तेजी दिसून येईल आणि जर NDA ने 300-330 जागा जिंकल्या तर शेअर बाजारात घसरण दिसून येईल असं PhillipCapital म्हटले आहे.
दुसरीकडे जर पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आल्यास, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर आकारणी, एमएसपी धोरण आणि मनरेगा पेमेंटमध्ये काही बदल होतात की नाही हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष जुलैच्या अर्थसंकल्पावर असेल, असे मिरे ॲसेटने सांगितले.
PM मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झाले भावूक, म्हणाले, माझ्या आईच्या मृत्यूनंतर…
तर MUFG बँकेनुसार, लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या कमी मतदानामुळे निकालावर अनिश्चितता वाढली आहे, मात्र पुन्हा एकदा देशात NDA सरकार येणायची शक्यता असल्याने शेअर बाजारात लोकसभा निवडणुकीनंतर तेजी दिसण्याची शक्यता आहे.