PM मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झाले भावूक, म्हणाले, माझ्या आईच्या मृत्यूनंतर…
PM Modi Nomination : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) वाराणसी मतदारसंघातून (Varanasi Lok Sabha) तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला आहे. मात्र त्यापूर्वी एका वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. काशीशी असलेले नाते सांगत पंतप्रधान मोदी भावूक झाले.
या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काशीमध्ये मला गंगा मातेने बोलावले आहे. मी प्रत्येक काम देवाची पूजा मानून करतो, लोकांचे प्रेम पाहून मला वाटते की, माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. माझ्या आईच्या मृत्यूनंतर गंगा माझी आई आहे. आई गंगा हिने मला दत्तक घेतले आहे असं म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले.
तर दुसरीकडे आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या काठावर दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली. याच बरोबर त्यांनी गंगा घाटावर आरतीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करताना गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह भाजप प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याच बरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसह अनेक नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतर्गत वाराणसीमध्ये 1 जून रोजी मतदान होणार आहे.