आधी पन्नास जणांची यादी, नंतर चार नावं फायनल; PM मोदींच्या उमेदवारीसाठी प्रस्तावक कोण?
PM Modi Nomination : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा (PM Modi Nomination) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मोदी वाराणसी लोकसभा (Varanasi Lok Sabha) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील. त्यांच्या या नामांकनाची जोरदार तयारी पक्षाने केली आहे. पीएम मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्षाने चार प्रस्तावकांची नावे फायनल केली आहेत. पीएम मोदींच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक कोण असावेत यासाठी मागील पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होती. परंतु, निर्णय काही होत नव्हता. सर्वात आधी पन्नास जणांची यादी तयार करण्यात आली होती. यानंतर या यादीतून १८ जणांची नावे ठरविण्यात आली. या नावांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय महामंत्री सुनील बंसल यांनी चर्चा केली.
यानंतर चार नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पीएम मोदी यांनी सोमवारी या नावांना मंजुरी दिली. मिडिया रिपोर्ट्सनुसार ही चार नावे ठरविताना भाजपने जातींचंही संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. या चार प्रस्तावकांमध्ये ओबीसी समाजातून बैजनाथ पटेल आणि लालचंद कुशवाहा, दलित समाजातून संजय सोनकर आणि ब्राह्मण समाजातून गणेश्वर शास्त्री यांची नावं निश्चित झाली आहेत.
बैजनाथ पटेल जनसंघाचे कार्यकर्ते आहेत. सेवापुरी गावात ते राहतात. सेवापुरी आणि रोहनिा या विधानसभा मतदारसंघात जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. या व्यतिरिक्त लालचंद कुशवाहा ओबीसी समाजातून येतात. संजय सोनकर दलित समाजातील मातब्बर नेते आहेत. ही नेते मंडळी आता पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी प्रस्तावक राहणार आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारा प्रस्तावक
ज्योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शुभ मुहूर्त निश्चित केला होता. तसेच राम मंदिर निर्माणासाठी भूमिपूजनचा मुहूर्तही त्यांनीच काढला होता. काशी विश्वनाथ धाम लोकार्पणच्या वेळेसही शुभ मुहूर्त गणेश्वर शास्त्री यांनीच काढला होता. गणेश्वर शास्त्री दक्षिण भारतातून काशी येथे स्थायितक झाले आहेत. ते आता येथील रामघाट परिसरात गंगा नदीच्या किनारी राहतात.
Modi Pune Speech : पुणे जिल्ह्यात NDA चौकार मारणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ग्वाही