Shirdi Lok Sabha : उत्कर्षा रुपवतेंचा झंझावाती प्रचार; लोखंडे, वाकचौरे यांना टेन्शन

Shirdi Lok Sabha : उत्कर्षा रुपवतेंचा झंझावाती प्रचार; लोखंडे, वाकचौरे यांना टेन्शन

Shirdi Lok Sabha Election Utkarsha Rupwate : शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha) राखीव झाल्यानंतर ही चौथी निवडणूक आहे. गेल्या तीन निवडणुकीत एकाही पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. प्रथमच वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा प्रेमानंद रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या रुपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिर्डीत तिरंगी लढत होत आहे. उत्कर्षा रुपवते यांचा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. मतदारांकडूनही त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.


महाविकास आघाडी अन् महायुतीत घमासान; सोलापुरात चेहरे बदलले, लढतही अटीतटीची


राजकीय वारसाचाही होतोय फायदा

रुपवते कुटुंबीय गेली अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख ही राज्यभर होती. दादासाहेब रुपवते हे उत्कर्षा रुपवते यांचे आजोबा होते. दादासाहेब हे मोठे राजकारणी होते. 1978 मध्ये त्यांनी आमदारकी देखील भूषवली होती. तसेच 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीमध्ये त्यांनी दोनदा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद देखील भूषवले. तसेच उत्कर्षा रुपवते यांचे वडील स्वर्गीय प्रेमानंद रुपवते हे देखील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांत गणले जात होते. त्यांचाच वारसा आता उत्कर्षा रुपवते या पुढे चालवत आहे. रुपवते परिवाराला मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. त्यामुळे रुपवते यांच्या राजकीय वारसदार म्हणून मतदार उत्कर्षा रुपवते यांच्याकडे पाहत आहे. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

महिला मतदारांकडूनही साद

मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्ष रुपवते या उच्चशिक्षित आहेत. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. त्यामुळे आजही त्या जनमानसात ओळखल्या जातात. काँग्रेसमध्ये असताना गाव पातळीवर त्यांनी पक्षाचे चांगले संघटन निर्माण केले होते. महिला आयोगाच्या सदस्य म्हणून काम पाहताना त्यांनी महिलांचे प्रश्न सोडविले आहे. रुपवते या प्रचारात थेट महिला मतदारांपर्यंत जात आहे. त्यांना महिला मतदारही जोरदार प्रतिसाद देत आहे.

पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार

आजी-माजींवर नाराजीचा फायदा उठवतायत

या मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे हे पहिल्यांदा निवडून आले होते. परंतु दुसऱ्या निवडणुकीत ते काँग्रेसकडे गेले. तेव्हा पराभूत झाले. ते भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर पुन्हा ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेले आहेत. त्यांच्या अनेक पक्ष बदल्यामुळे शिर्डीच्या जनतेत नाराजी आहे. तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची ही तिसरी टर्म आहे. परंतु खासदार झाल्यानंतर ते लोकांच्या संपर्कात राहिले नाहीत. थेट निवडणुकीत जनसंपर्क साधत आहेत. त्याबाबत अनेकदा त्यांच्या पक्षातील लोकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे दोघांविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा उत्कर्षा रुपवते या उठविताना दिसत आहे.

वंचितची ताकद, मुस्लिम व्होट बँक

या मतदारसंघात रामदास आठवले यांची आरपीआयही महायुतीबरोबर आहे. येथून बौध्द उमेदवार दिला जात नाही, यावर अनेकदा आठवलेंच्या कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा फायदा रुपवते यांना होईल, असे बोलले जाते. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे. त्याचा फायदा आता वंचितच्या उमेदवार म्हणून उत्कर्षा रुपवते यांना होईल आहे. तर प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघात जास्तीत सभा घेणार आहेत. शनिवारी चार मे रोजी प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ होत आहे. त्याचा मोठा फायदा रुपवते यांना होणार आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय, मुस्लिम समाजाचा एकगठ्ठा मतदान आहे. हे मतदान मिळविण्यासाठी रुपवते यांची जोरदार तयारी प्रचारावरून दिसून येत आहे. हे हक्काचे मतदान घडवून आणण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज