शिवरायांचा अपमान करणाऱ्या अमित शाहांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची CM फडणवीसांकडे मागणी

शिवरायांचा अपमान करणाऱ्या अमित शाहांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची CM फडणवीसांकडे मागणी

Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट वेळ आलेली नाही. छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता? ज्यांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रावर औरंजेबाप्रमाणे सुडाने कारवाया केल्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार.

गेली तीन महिने यांचेच लोक औरंगेजबाचं थडगं उखडून टाकण्याच्या विचारून भारावून गेले होते. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खास चित्रपटाचं प्रदर्शन केलं. आम्ही ज्याला थडगं म्हणतो, त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर औरंगजेबाची समाधीचा असा केला. थडग्याला समाधीचा दर्जा दिला, यापेक्षा वाईट काय होणार? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म (Maharashtra Politics) झाला. त्यामुळे त्यांना औरंगजेबाइतकं प्रेम आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ कार्ड नसल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, फक्त 3 दिवसांची मुदत

एकनाथ शिंदे, अजित पवार, अन् देवेंद्र फडणवीस या छत्रपतींच्या ढोंगी चाहत्यांना देखील यावर आक्षेप घ्यावा, असं वाटलं नाही. बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महारांजा एकेरी उल्लेख केला. त्यांनी शिवाजी…शिवाजी असं म्हटलं. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरे-तुरे करायला? काय करता देवेंद्र फडणवीस? हा महाराजांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्‍यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्ञान आम्हाला अमित शाहांकडून घेण्याइतकी वाईट वेळ आलेली नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं राऊतांनी म्हटलंय. इतरांवर करता ना तुम्ही? मग देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी अभय आहे का? असं देखील राऊतांनी विचारलं आहे.

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तुरूंगातच घेतला गळफास

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तिथीनुसार काल छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे देशाला अन् जगाला प्रेरणा देणार असल्याचं म्हटलं. यावरून संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीका केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube