Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल…

Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल…

Amit Shah News : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्य बैठकीत केलंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईत भाजप कार्यकर्त्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये अमित शाह निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आधी अमित शाह यांनी व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करु नये, अशा सूचना दिल्या होत्या.

धक्कादायक! ‘शर्मा नव्हे सिद्दीकी’, कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड

अमित शाह म्हणाले, मागील 60 वर्षांत कोणताही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही, त्यामुळे यंदासुद्धा कार्यकर्त्यांनी निराशा गाडून कामाला लागा. यंदाची महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदणार असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार स्थापन करणार असल्याचा शब्द अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिलायं.

‘इंजिनिअर पॉलिटिक्स’ फोडणार घाम! ‘त्या’ १६ मतदारसंघात PDP-NC चं टेन्शन वाढलं

परिक्षेत 30 टक्के तरीही विद्यार्थी गावात मिठाई वाटतो हा मुर्खपणाच…
राहुल गांधी यांनी किती निवडणूका जिंकल्या आहेत. एका परिक्षेत 90 टक्के गुण तर दुसऱ्या विद्यार्थ्याला 85 टक्के आणि 20 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 30 टक्के गुण मिळाले तरीही 30 टक्के मिळालेला विद्यार्थी गावात मिठाई वाटतो हा मुर्खपणा असल्याची अप्रत्यक्ष टीका अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलीयं.

उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दोन जागा आल्या होत्या, तरीही भाजपचा कार्यकर्ते पक्ष सोडून गेला नव्हता, हा आपला इतिहास आहे. 1980 च्या दशकातील कार्यकर्त्यांना हे माहिती होतं, तरीही कार्यकर्ता हरला नाही, आत्ताही आपल्याला लढायचं आणि जिंकायचं आहे. आपण विरोधक असतानाही राम मंदिर, जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत होतो, आजही बोलतो असं अमित शाह यांनी स्पष्ट केलंय.

अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात अमित शाह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असून मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबतही अमित शाह संवाद साधणार आहेत. सध्या दादरमधील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठक सुरु असून साडेचार वाजता नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये ठाणे आणि कोकण विभागातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube