उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर

  • Written By: Published:
उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray criticism of Amit Shah: नागपूर येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे यांनी अमित शाह यांची तुलना थेट अहमदशहा अब्दालीबरोबर केली होती. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


Daund Assembly Constituency : राहुल कुल यांचं टेन्शन वाढलं…दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला?

ज्या 370 कलमानुसार काश्मीर भारतापासून दूर झाले होते. ते 370 कलम रद्द करणारे मोदी यांच्याबरोबर अमित शाह आहेत. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू आहे. राम मंदिर असेल किंवा काशी विश्वनाथाने मंदिर असो. हिंदू म्हणून आमची जी ओळख पुसण्याचा प्रयत्न झाला. पाचशे वर्षानंतर ते प्रयत्न मोडित काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत. अशा पद्धतीने संबोधने करणारे असतील, त्यांनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

अजितदादांना मोठा धक्का! वळसे पाटील घेणार पवारांची भेट? महायुतीत खळबळ…

कुठलीही योजना बंद होणार नाही. कुणाचे मानधन कमी केले जाणार नाही. उलट आजच होमगार्डचे मानधन दुप्पट केले आहे. आमच्या विरोधकांनी संभ्रम पसरविण्याचे प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे विकासकामासाठी, कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी प्रॉब्लेम नाही. सगळ्यासाठी पैसे आहेत. आता विरोधकांच्या पोटात गोळा उठल्याने ते आता संभ्रम निर्माण करत आहेत. हे बंद होणार ते बंद होणार असे सांगत आहत. परंतु काहीही बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती षशिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळई उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. ठाकरे म्हणाले, अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन बंददारा आड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दारा आडचे धंदे बंद करावेत. हिंमत असेल तर अमित शाह यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube