बंद दारामागचे धंदे सोडा अन् हिम्मत असेल तर…, उद्धव ठाकरेंचा भरसभेत अमित शाहांना आव्हान

  • Written By: Published:
बंद दारामागचे धंदे सोडा अन् हिम्मत असेल तर…, उद्धव ठाकरेंचा भरसभेत अमित शाहांना आव्हान

Uddhav Thackeray On Amit Shah : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज (29 सप्टेंबर) नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर देखील निशाणा साधला.

गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगत आहे. 2014 मध्ये आम्ही देखील मोदींचं प्रचार केला होता तेव्हा मोदी 15 लाख रुपये देणार होते मात्र आता त्याचे 1500 का झाले? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच आम्ही लोकसभा जिंकली आणि आता विधानसभा देखील जिंकायची आहे, लोकं मेली तरी चालेल पण यांना सत्ता हवी अशी टीका त्यांनी भाजपवर (BJP) केली. तसेच परंपरेनं दसरा मेळावा घेणार त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा मला बोलत होते की मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक आहे मात्र मी संस्थापक असेन तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात. हे बंद दारामागचे धंदे सोडा आणि हिम्मत असेल तर शिवरांयांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा, हिम्मत असेल तर शिवसेना संपवून दाखवा असा आव्हान देखील त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीवर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी सिनेटची निवडणुक दोन वर्ष पुढे ढकलली होती मात्र तरी देखील आम्ही जिंकलो. ईव्हीएम नव्हतं म्हणून या निवडणुकीत अभविपला कमी मतं मिळाली. रविवारी निवडणुक होती कोर्टाने हातोडा मारला आणि बुधवारी आपण जिंकलो असं देखील उध्दव ठाकरे म्हणाले.

स्वतःशी लग्न करून व्हायरल अन् 26 व्या वर्षी आत्महत्या, टिकटॉक स्टार कुब्रा अयकुटने दिला सर्वांना धक्का

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. शिवरायाचा पुतळा दिमाखदार आहे. त्यासाठी शिल्पकाराला धन्यावाद. मधल्या काळात मालवनमध्ये जे झालं ते लाजीरवानं होतं. त्यांना निवडणूक जिंकायची होती. शिवारायाच्या पुतळ्याच पैसे खाल्ले. समितीचा रिपोर्ट आला आणि दाडी खाजवत मिंदे म्हटले वार्याने पुतळा पडला. वार्याने तुमची दाढी नाही हालत, असा टोलाही उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube