स्वतःशी लग्न करून व्हायरल अन् 26 व्या वर्षी आत्महत्या, टिकटॉक स्टार कुब्रा अयकुटने दिला सर्वांना धक्का

  • Written By: Published:
स्वतःशी लग्न करून व्हायरल अन् 26 व्या वर्षी आत्महत्या, टिकटॉक स्टार कुब्रा अयकुटने दिला सर्वांना धक्का

Kubra Aykut : गेल्या काही दिवसांपूर्वी स्वतःशी लग्न करून तुर्कीची टिकटॉक स्टार कुब्रा अयकुट (Turkey TikTok star Kubra Aykut) सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तर आता तिने वयाच्या 26 व्या वर्षी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तुर्की मीडियाने (Turkish Media) दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबूलच्या सुल्तानबेली येथील एका लक्झरी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडीमारून आत्महत्या केली. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

अयकुटच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर शोककळा पसरली असून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर कुब्रा अयकुट “वेडिंग विदाऊट अ ग्रुम” (Wedding Without a Groom) व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाली होती. अयकुटने तिच्या मृत्यूपूर्वी काही निराशाजनक पोस्ट शेअर केल्या होत्या असं चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तर काही दिवसापूर्वी तिने आपल्या वजनाबाबत एक पोस्टही केली होती. तिने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले की, मी सर्वकाही प्रयत्न करून पाहिले मात्र तरीही देखील माझे वजन वाढत नाही. दररोज माझे एक किलो वजन कमी होती आणि त्यामुळे मला काय करावे हे समजत नाही असं तिने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते.

वेडिंग विदाऊट अ ग्रुम या व्हिडिओमध्ये अयकुटने परंपरेपासून दूर राहून टिकटॉकवर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मी माझ्यासाठी योग्य वर शोधू शकत नाही, त्यामुळे मी स्वतःशी लग्न करत आहे असं तिने या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले होते.

‘आमच्या नादी लागू नका’, शरद पवारांचा सुशिलकुमार शिंदेंना मिश्किल टोला

तर दुसिकडे तिने त्याच दिवशी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तिने बर्गर खाताना नर्व्हस वधू असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे तुर्की अधिकाऱ्यांनी अयकुटच्या मृत्यूचा पुढील तपास सुरू केला असून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम विश्लेषण सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube