‘दादा’चा वादा म्हणत… राष्ट्रवादीचा तगडा प्रचार, सोशल मीडियाही व्यापला

  • Written By: Published:
‘दादा’चा वादा म्हणत… राष्ट्रवादीचा तगडा प्रचार, सोशल मीडियाही व्यापला

Mahrashtra Assembly Election 2024 : महायुतीमध्ये विधानसभा जागा (Mahrashtra Assembly Election 2024) वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनतेमध्ये जावून प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने (Nationalist Congress) प्रचाराच्या दृष्टीने तगडे नियोजन केले असून, त्यांना थेट जनतेमध्ये जावून प्रचार सुरू केलाय. मानवी साखळी, स्वाक्षरी मोहीत, सरकारी योजनेंची जनजागृतीची माहिती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहे. त्याला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

फॉर्म्युला ठरला, महायुतीमध्ये जागावाटपावर तिन्ही नेते एकमत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

राष्ट्रवादीकडून वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित केले जात आहे. त्यात अॅनिमेटेड व्हिडिओ, स्वाक्षरी मोहीम, रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी असे उपक्रम राबविले जात आहे. तरुण मतदार आकर्षित करण्यासाठी, पक्षाबरोबर जोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही खुबीने वापरला जात आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात असे उपक्रम राबविले जात आहे. शिरुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी उपक्रम आयोजित केला होता. मांडवगण फराटा भागात मानवी साखळी बनवत महिलांनी कल्याणकारी योजनांच्या समर्थनात दगावात जागृती मोहिम राबविली. या उपक्रमात मांडवगण फराटाचे सरपंच समिक्षा फराटे, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे, महिला तालुकाध्यक्ष आरती भुजबळ यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. पुणे शहरातील पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातही स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ हजारो लाकांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही पुण्यात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत हजारो लोकांनी पांढऱ्या कॅनव्हासवर स्वाक्षरी करत माझी लाडकी योजनेला पाठिंबा दिला.


…अरे कोंबड्या बघूया तरी तुझ्यात जोर आहे का?, सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल


राज्यभरात उपक्रम

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे राष्ट्रवादी युवककडून लाडकी बहीण योजना व इतर विविध कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे उपस्थित होते. तर सोलापूरमधील मोहोळ मतदारसंघात रांगोळी स्पर्धा झाली. पिंपरी विधानसभा मतदारसंघाही स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आला.

सगळ्या आघाड्या झटून कामाला

पक्षाची युवक आणि महिला आघाडी, विद्यार्थी संघटना, सांस्कृतिक विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभाग आघाडी मतदारांशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. युवा नेते सूरज चव्हाण यांनी राज्यातील विविध मतदारसंघात स्वाक्षरी मोहिम हाती घेतलीय.

सोशल मीडियावर तगडा प्रचार

थेट जनतेशी संवाद साधणाऱ्याबरोबर सोशल मीडियावरून राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सोशल मीडियावर नवनवीन तंत्रांचा वापर करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबद्दल सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे, याची माहिती दिली जात आहे. माझी लाडकी बहिण योजना. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 52 लाख कुटुंबाने मोफत सिलिंडर याचा प्रचार केला जात आहे.

‘दादा’चा वादा प्रचार गीताचा सोशल मीडियावर धुमाकूळ

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘दादा’चा वादा हे प्रचार गीत तयार केले आहे. आठ दिवसांपूर्वी हे गीत लॉंच केले आहे. या गीताला एका दिवसात एक कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर काही आठवड्यांपूर्वी अजित पवार यांनी काम करत आलोय, काम करत राहू हे एक नवीन प्रचार गाणंही लॉंच केले. या गाण्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर 75 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube