…अरे कोंबड्या बघूया तरी तुझ्यात जोर आहे का?, सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Sadabhau Khot : आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहे. दरम्यान आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), शरद पवार आणि संजय राऊत (Sanjay Raut यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख घरकोबंडा असा केला.
Marathi Movie: लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट, आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘पाणीपुरी’
संजय राऊतांनी कोंबड्यासारखे रोज बांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षांचा पाठिंबा आहे, असं पत्र द्यावं, असा टोला खोत यांनी लगावला.
शिराळा येथील रयत क्रांती संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, रोज एक घर कोंबडा बांग देतो, संजय राऊत नावाचा. त्या कोंबड्याला मी सांगतो, रोज बांग देऊ नकोस खुराड्यातनं. तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना की माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यास पाठिंबा देत आहे. अरे बघुया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का, असं खोत म्हणाले.
‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक
पुढं बोलताना खोत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम पवार करत आहे. हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतही ते या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचे काम करत आहे. मी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे, जी माणसं मराठा मविआमधून निवडणूक आले आहेत. त्यांनी सरकाराल एक पत्र लिहावं जरांगे पाटलांना की, मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्याला माझा पाठिंबा आहे.
रोहित पवार हा विद्वान माणूस आहे. तुम्ही महाराष्ट्रात आग लावत सुटलाय. भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे. तुम्ही लिहून घ्या की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवारचा पाठिंबा आहे. हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा, असं ते म्हणाले.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले, अनेक योजना सुरू झाल्या. मात्र महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढू, असंही खोत म्हणाले.