महाराष्ट्रात बिहार पॅटर्न! अमित शाहांसोबत राजकीय चर्चा पण..,; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं क्लिअर

महाराष्ट्रात बिहार पॅटर्न! अमित शाहांसोबत राजकीय चर्चा पण..,; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं क्लिअर

Dcm Ajit Pawar : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांनी (Amit Shah) घातल्याची बातमी समोर आली. या बातमीनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय. केंद्रीय मंत्री अमित शाहांसोबत राजकीय चर्चा झाली पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलंय. ते पुण्यात बोलत होते.

Video : देवेंद्रंना अजिबात रोमान्स कळत नाही अन् जमतही नाही; अमृता फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

अजित पवार म्हणाले, बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, मी काल दिवसभर बारामतीत होतो, गणेश मंडळांना भेटी देत होतो, तिथून 6 वाजता मी निघालो पण रात्री अमित शाहा यांच्याशी भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला निघाले तेव्हा आम्हाला त्यांनी वेळ दिला. या भेटीत राजकीय, राज्याच्या हिताच्या कापूस, कांदा, ऊसाचा भाव ठरवणे, शेतकऱ्याला मदत या सर्व गोष्टींवर बारकाईने चर्चा झाली. काही गोष्टींमध्ये सांगितलं की प्रसताव पाठवून द्या, असं शाहांनी सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय.

तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक भागांत पिकांचं नूकसान झालंय. मुसळधार पावसामुळे सर्वत्र धरणे भरली आहेत. विशेषत: जायकवाडी धरण भरल्याने नगर आणि नाशिकची जनता समाधानी आहे, यापेक्षा दुसरी कोणतीही चर्चा अमित शाहांसोबत झाली नसल्याचं अजित पवार यांनी क्लिअर केलंय.

“जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला…” राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा

पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख :
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत होते. यावेळी अजित पवार यांनी भाऊसाहेब रंगारी मंडळ ट्रस्टला भेट देऊन गणरायाची आरती केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं, पुण्यातील गणेशोत्सवाला जगात मान आहे. या गणेशोत्सवाची वाट सगळे बघतात. लोकमान्य टिळक यांनी जी परंपरा सुरू केली आहे, ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. कसबा मानाचा पहिला गणपती आहे. इथून मी सुरुवात केली आहे. सगळेच मानाचे गणपती आहेत, सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. गणरायाला प्रार्थना आहे की सगळीकडे सुख- समृद्धी राहो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती प्लेक्सच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, इतक्या बारक्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायची गरज नाही. आमची महायुती आहे, प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही. या लोकांना तुम्ही प्रसिध्दी देता, कारण नसताना युतीमध्ये अंतर आहे का, असा प्रयत्न केला जातो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube