कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तुरूंगातच घेतला गळफास

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तुरूंगातच घेतला गळफास

Vishal Gawali Ends Life In Jail Toilet Taloja : कल्याणमध्ये अल्पवीयन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली. त्याने नवी मुंबईच्या तळोजा कारागृहामध्ये (Taloja Jail) जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशाल गवळी (Vishal Gawali) असं या आरोपीचं नाव आहे. त्याने कोठडीतच गळफास लावून घेत जीवन संपवलं. तळोजा कारागृहामध्ये ही घटना सुमारे चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली (Girl Sexual Assault Case) आहे. घटनेने एकच खळबळ उडाली. निवृत्त न्यायाधीश याप्रकरणी चौकशी करत आहेत. तर विशाळ गवळीच्या (Kalyan Crime) आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला विशाल गवळीने फूस लावून घरी आणलं होतं. त्याने या मुलीवर घरातच लैंगिक अत्याचार केले. घडलेला प्रकार इतर कोणाला समजू नये, यासाठी त्याने घरातच या मुलीची हत्या (Kalyan Crime News) केली. तिचा मृतदेह बापगाव परिसरात विशालने फेकून दिला होता. त्यानंतर तो शेगावला पळून गेला होता. पोलिसांनी सापळा रचून विशाल गवळीला शेगावमधील शिवाजी चौकातून ताब्यात घेतलं होतं. या घटनेनंतर कल्याणसह संपूर्ण राज्यात संतापाचे पडसाद होते.

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..

विशाल गवळी कल्याणमधील सराईत गुंड असल्याचं सांगितलं जातंय. विशालवर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड, लहान मुलांचे लैंगिक शोषण या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरामध्ये विशालच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब परिसर सोडून गेल्याचं देखील सांगितलं जातंय.. मात्र, विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त होता. त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नव्हती.त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन हत्या केली. त्यानंतर मित्रांसोबत जाऊन दारु विकत घेतली अन् तो शेगावला पळून गेला होता.

एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे खरंच तक्रार केली का? अजितदादांनी क्लिअरच केलं..

आतापर्यंत विशाल गवळीची तीन लग्न झाली होती, अशी माहिती मिळतेय. दोन बायका त्याला सोडून गेल्या होत्या. तर तिसरी बायको एका खाजगी बॅंकेत नोकरी करते. तर या घटनेदरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती विशालने तपासादरम्यान दिली होती. या दोघांनी भिवंडीजवळ असलेल्या बापगाव परिसरात रिक्षातून मृतदेह आणला होता अन् फेकून दिला होता. परंतु याच विशालने पोलीस कोठडीत जीवन संपवल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube