Mumbai Crime : चक्क सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; कुर्ला परिसरातील धक्कादायक घटना

Mumbai Crime : चक्क सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; कुर्ला परिसरातील धक्कादायक घटना

Mumbai Crime : मुंबईमध्ये (Mumbai Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात खळबळ माजली आहे. कुर्ला परिसरात रविवारी रात्री एका सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी त्यांनी ही सुटकेस उघडली तेव्हा यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हा मृतदेह राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आला.

चक्क सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह…

घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली की, रविवारी दुपारी कुर्ला पोलिस ठाण्यात एक फोन आला. त्यात सांगण्यात आलं की, सी एस टी रोड शांतीनगरच्या समोरिल बाजूला मेट्रो रेल्वेचं काम सुरू आहे. या ठिकाणी एक बेवारस सुटकेस आढळली आहे. ज्यामध्ये संशयित वस्तू असू शकतात. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तपास केला असता. त्यामध्ये चक्क एका महिलेचा मृतदेह आढळून आला. आता हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

IND VS AUS Final : ‘तो पॅट कमिन्स…’ म्हणत टीम इंडियाच्या पराभवानंतर आमदार तनपुरेंची कन्या ढसा ढसा रडली

दरम्यान या प्रकरणात खुनाची बाब स्पष्ट आहे. तसेच या महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 च्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तीने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेली आहे. तर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये दुमडलेल्या अवस्थेत होता. मात्र अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर या परिसरामध्ये कोणतीही महिला बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल झाल्याचे पोलिसांकडून शोधले जात आहे. तर तिच्या फोटोवरून देखील तिचा तपास केला जात आहे.

IND VS AUS Final : एक प्रशिक्षक म्हणून त्यांना सर्वांना…, पराभवानंतर कोच द्रविडने सांगितली ड्रेसिंग रूममधील परिस्थिती

कुर्ल्यातील नेहरूनगरच्या इमारतीच्या टेरेसला आग

तर या कुर्ला परिसरात दिवाळी दरम्यान आगीची घटना घडली होती. कुर्ला (Kurla fire) परिसरामध्ये नेहरूनगर या इमारतीच्या टेरेसला भीषण आग लागली होती. एका इमारतीच्या टेरेसवर हा मंडप उभारण्यात आला होता. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. दरम्यान दिवाळीच्या मध्येच ही दुर्घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. मात्र अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube