IND VS AUS Final : ‘तो पॅट कमिन्स…’ म्हणत टीम इंडियाच्या पराभवानंतर आमदार तनपुरेंची कन्या ढसा ढसा रडली

IND VS AUS Final : ‘तो पॅट कमिन्स…’ म्हणत टीम इंडियाच्या पराभवानंतर आमदार तनपुरेंची कन्या ढसा ढसा रडली

IND VS AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची मुलगी देखील भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडली. त्यात तिने थेट ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर आपला राग काढला.

IND VS AUS Final : एक प्रशिक्षक म्हणून त्यांना सर्वांना…, पराभवानंतर कोच द्रविडने सांगितली ड्रेसिंग रूममधील परिस्थिती

आमदार तनपुरेंची कन्या ढसा ढसा रडली…

रविवारी रात्री भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर अनेक क्रिकेट रसिकांना जेवन केले नाही. तर अनेक लहान मुलांचे रडतानाचे व्हिडीए व्हायरल झाले. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची मुलगी आरोही देखील हमसून हमसून रडली. तसेच तिने ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला चांगलेच बोल लगावले. ती म्हणाली. तो पॅट कमिन्स घाणेरडा आहे.

पुढे ती असं ही म्हणाली की, रोहित शर्माचा हा शेवटचा विश्वचषक असेल. तो पॅट कमिन्स घाणेरडा आहे. तो अगोदरच 5 वेळा जिंकला आहे. भारत फक्त दोनदा जिंकला आहे. तो पॅट कमिन्स मला बिलकुल नाही आवडत असं म्हणत तिने आपला राग व्यक्त करत. टीम इंडियाच्या पराभवावर आपलं दुखः व्यक्त केलं आहे. तर यावेळी तिची आजी तिला समजावून सांगत होती.

Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाज आक्रमक; एक गट मवाळ तर दुसऱ्याचा विरोध कायम

प्राजक्त तनपुरे यांची मुलगी आरोही हीचा हा व्हिडीओ त्यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये कॅप्शनमध्ये लिहिले की, आजच्या पराभवाने कोट्यावधी भारतीयांची मने दुखावली. माझी कन्या आरोही त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते. भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. आस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन! असंख्य भारतीयांचा हिरमोड झाला. माझी मुलगी आरोही त्याला अपवाद नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube