Aadhaar Card : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य नाही, EPFO चा मोठा निर्णय!
Aadhaar Card : EPFO ने आधार कार्डबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्तीसाठी आधार कार्डचा वापर करता येणार नाही. EPFO ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारकार्डलाAadhaar Card वगळले आहे. याबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees’ Provident Fund Organisation)त्याबद्दलचं परिपत्रक देखील जारी केलं आहे.
‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट
श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या EPFO ने सांगितलं आहे की, आधारकार्डचा वापर करुन जन्मतारीख बदलता येणार नाही. ईपीएफओने 16 जानेवारीला याबद्दलचं परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार UIDAI कडून एक पत्र देखील मिळाले आहे.
सुशीलकुमार शिंदेंना भाजपने खरंच ऑफर दिली का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
जन्मतारीख बदलल्यास आधार कार्ड वैध राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते वैध कागदपत्रांच्या यादीतून काढून टाकले पाहिजे, असं म्हटलं आहे. त्यामुळं जन्मतारीख बदलण्यासाठीच्या वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्डला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ईपीएफओच्या माहितीनुसार, जन्म प्रमाणपत्राच्या मदतीने हा बदल केला जाऊ शकतो. त्याशिवाय कोणत्याही सरकारी मंडळाकडून किंवा विद्यापीठाकडून मिळालेले मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा बदलीचा दाखलाही वापरता येईल. त्याचे नाव व जन्मतारीख नमूद करावी.
याशिवाय सिव्हील सर्जनने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन क्रमांक, सरकारी पेन्शन आणि मेडिक्लेम प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखल्याचा वापर करता येईल.
UIDAI ने म्हटलंय की, आधार कार्डचा वापर ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून केला जावा. मात्र, त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणून वापर करु नये. आधार हे 12 अंकी युनिक ओळखपत्र आहे. ते भारत सरकारने जारी केले आहे.
तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. मात्र, आधार बनवताना त्यांच्या विविध कागदपत्रांनुसार त्यांची जन्मतारीख टाकण्यात आली. त्यामुळे जन्म दाखल्याला पर्याय म्हणून आधार कार्डला वैध मानू नये, असं म्हटलं आहे.