‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट

  • Written By: Published:
‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश आंबेडकरांना निमंत्रणाचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळं इंडिया आणि पर्यायाने महाविकास आघाडीसोबत आंबेडकर असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘​​​​​​​राम आएंगे तो…’ गाण्याची गायिका नेमकी आहे तरी कोण? 

राहुल गांधींना फक्त भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाशं आंबेडकर किंवा वंतिचला पत्र पाठवलं नाही, किंवा निमंत्रण दिलं नाही. इंडिया आघाडीत ‘वंचित’च्या समावेशाचा मुद्दा प्रलंबित असल्याने आधी त्यावर निर्णय घ्या, मगच यात्रेत सहभागी होता येईल, अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. निमंत्रणाला उत्तर देणारे पत्र त्यांना राहुल गांधींना पाठवले.

आव्हाडांची वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच; न्यायव्यवस्थेवर काल बोलले पण आज इन्कार 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या तृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी सुमारे 6700 किलोमीटरची पदयात्रा सुरू झाली. भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा असून या पदयात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असे नाव देण्यात आले. या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला. याआधी वंचित आघाडीने खासदार राहुल गांधी यांना मुंबईत झालेल्या संविधान सन्मान सभेसाठी आमंत्रित केले होते. त्या बैठकीला खासदार राहुल गांधी उपस्थित नव्हते. मात्र, त्यांनी आंबेडकरांना पत्र पाठवून त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केले आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांमधील संवाद वाढत असल्याचं दिसून येतं.

दरम्यान, आंबेडकर यांनी सशर्त निमंत्रण स्वीकारले आहे. भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे कठीण जाईल, यावर भर दिला. वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे या यात्रेत इंडिया आघाडीचा घटक नसतांना सहभागी झाल्यास चुकीचा संदेश लोकांमध्ये जाईल. हे कॉंग्रेस आणि वंचित दोन्ही पक्षांसाठी घातक आहे, असं आंबेडकरांनी पत्रात नमूद केलंय. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि मविआ सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवावे, तेव्हा यात्रेत सहभागी होता येईल, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेसाठी आंबेडकारंना निमंत्रण देण्यात आलं. मात्र, त्यांचा इंडिया किंवा मविआत समावेश नाही. मात्र, त्यांचा इंडिया आघाडीत समावेश झाल्यास महायुतीपुढील आव्हान वाढणार आहे.

भाजपची टीम अकोल्यात तळ ठोकून
काँग्रेसने आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेतलं तर भाजपकडे तेवढा तगडा उमेदवार नाही. गेल्या महिनाभरापासून अकोला मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर, नारायण गवाणकर, डॉ.रणजित पाटील, विजय मालोकार, गोपी ठाकरे यांच्या व्यतिरिक्त भाजपकडे दुसार उमदेवार नाही. त्यामुळे भाजपची केंद्रीय टीमकाही दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube