सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘​​​​​​​राम आएंगे तो…’ गाण्याची गायिका नेमकी आहे तरी कोण?

सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘​​​​​​​राम आएंगे तो…’ गाण्याची गायिका नेमकी आहे तरी कोण?

Swati Mishra Song: येत्या 22 जानेवारीला कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येतील (Ayodhya) भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महासोहळ्याचे यजमान असणार आहेत. त्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळत आहेत. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होतीलच पण त्याआधी बिहारच्या एका गायिकेने गायलेले राम आयेंगे हे बोल देश- परदेशातील राम भक्तांच्या मुखी ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे देशाचे पंंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील या गायिकेच्या मधूर आवाजाची भूरळ पडली आहे. (Raam Aayenge Song) .

“राम आयेंगे” हे गाणं करोडो भक्तांच्या हृदयात उतरणाऱ्या गायिकेचे नाव स्वाती मिश्रा (Swati Mishra) असे असून ती, बिहारच्या छपरा जिल्ह्यातील आहे. तिने गायलेले हे गाणे सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल झाले असून, हे गाणे मंत्रमुग्ध करणारे असल्याचे मोदींनी म्हटले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या राम आयेंगे गाण्यापूर्वी स्वाती यांची अनेक छठ गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. परंतु, त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती जेवढी पसंती राम आयेंगे या गाण्याला मिळत आहे.

स्वाती मिश्रा या छपरा शहरापासून जवळ असलेल्या माल गावातील रहिवासी आहेत. येथूनच त्यांनी आपल्या संगिताचा प्रवास सुरू केला होता. स्वाती यांचे प्राथमिक शिक्षण छपरा येथे तर, उच्च शिक्षण बनारसमधून पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी मुंबई गाठत संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली आहे.

Saqib Saleem: अखेर साकिब सलीमने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, अभिनेत्याने…

रामावरील गाणे व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून प्रचंड प्रेम मिळत असून, यासाठी त्यांनी करोडो चाहत्यांचे आभार मानले आहेत.आजही अनेक घरांमधील मुलींना घराबाहेर पडून स्वच्छंदी आयुष्य जगण्याची मुभा नाहीये. मात्र, मला माझ्यामनाप्रमाणे जगण्याची मुभा घरच्यांनी दिली. त्यामुळे आपल्या यशात कुंटुबियांचादेखील मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. राम आए हैं (Ram Aaye Hain) या स्वातीच्या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. स्वाती इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या गाण्यांची माहिती नेटकऱ्यांना देत असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज