Saqib Saleem: अखेर साकिब सलीमने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, अभिनेत्याने…

Saqib Saleem: अखेर साकिब सलीमने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, अभिनेत्याने…

Saqib Saleem: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता साकिब सलीमने (Saqib Saleem) अलीकडील डबिंग मधला एक स्निपेट शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिली आहे. (Social Media) “83”, “क्रॅकडाउन” आणि “रंगबाज” मधील त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टची खास झलक शेयर केली आहे.

साकिब सलीमची त्याच्या कलाकुसरशी असलेली बांधिलकी आणि त्याच्या कामाच्या उत्साहात प्रेक्षकांना सामील करून घेण्याची त्याची तयारी यामुळे चर्चा आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. चाहते नव्या प्रोजेक्टसाठी वाट बघत असून आता नवीन काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. “क्राइम बीट,” आणि “सिटाडेल” सारख्या रोमांचक प्रोजेक्टसाठी चाहते वाट बघत आहेत.

आगामी प्रोजेक्ट: सिटाडेल वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. साकिब सलीमच्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि सिटाडेल मध्ये काम करणार आहे का अश्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. 83 आणि रंगबाज मधील त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा साकिब सलीम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. साकिब सलीम येणाऱ्या वर्षात काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

नव्या इनिंगची सुरुवात: या नव्या प्रोडक्शन हाऊस च्या अंतर्गत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स ची निर्मिती होणार असल्याचं कळतंय. नव्या कथा आणि नव्या प्रोजेक्ट ची निर्मिती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कामगिरीने प्रेक्षकांना कायम मोहित करणारा साकिब आता सिनेमॅटिक अनुभवांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊससह तो अष्टपैलू अभिनेता तर आहेच. आता नव्या इनिंगची सुरुवात करताना तो अजून उत्तम प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याचं सांगत आहे.

ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; पत्नीसाठी खिलाडी कुमारची खास पोस्ट, म्हणाला…

मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात : या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत. साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज