भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!

भारत-पाक तणावात गुडन्यूज; भोजनाची थाळी झाली स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावात (India Pakistan Tension) सर्वसामान्य जनतेसाठी चांगली बातमी आली आहे. खरंतर महागाईच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे. या वर्षात एप्रिल महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्चात थोडीशी कपात झाली आहे. क्रिसिलच्या एका विभागाने तांदळाच्या किंमतीच्या आधारे सांगितले की शाकाहारी थाळीच्या खर्चात वार्षिक आधारावर चार टक्के आणि मासिक आधारावर खर्च एक टक्का कमी झाला आहे.

शाकाहारी थाळी झाली स्वस्त

भाजीपाल्याच्या किंमतीत घट झाल्याने जेवणाचा खर्च कमी झाला आहे. या दरम्यान टोमॅटो 34 टक्के, बटाटे 11 टक्के आणि कांद्याच्या दरात 6 टक्के घट झाली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की उच्च आयात शुल्कामुळे वनस्पती तेलाच्या किंमतीत 19 टक्के आणि एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सहा टक्के वाढ झाल्याने शाकाहारी थाळीच्या खर्चातील घसरण मर्यादीत केली आहे.

आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं…

नॉन व्हेज थाळीही स्वस्त

मांसाहारी थाळीच्या किंमतीत वार्षिक आधारावर चार टक्के आणि मासिक आधारावर दोन टक्के घट झाली आहे. आता या थाळीची किंमत 53.9 रुपये प्रति थाळी इतकी झाली आहे. मांसाहारी भोजनाच्या किंमतीत घसरण भाजीपाला आणि पोल्ट्री किंमतीत कपात झाल्याने झाली आहे. क्रिसील इंटेलिजन्सचे निदेशक पुशन शर्मा यांनी सांगितले की आगामी काळात मजबूत घरेलू उत्पादनाच्या दरम्यान गहू आणि डाळीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक पुरवठ्यात तेजी आल्याने पुढील दोन ते तीन महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता असल्याचे शर्मा म्हणाले.

किंमती कशा ठरतात

क्रिसिलनुसार घरातील थाळी तयार करण्यासाठी लागणारा खर्च भारतातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीच्या आधारे निश्चित केला जातो. या गणनेत धान्य, डाळी, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल आणि घरगुती गॅस यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किंमतींचा समावेश असतो. मासिक आधारावर किंमतीत होणारे बदल सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करतात. जर भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या तर थाळीच्या एकूण खर्चात वाढ होते. अशाच प्रकारे अन्य आवश्यक वस्तूंच्या किंमतीतील चढ उतार थाळीचा खर्च निश्चित करतो.

ICAI CA Exam Postponed : भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube