मतचोरीच्या तक्रारींसाठी वेबसाइट अन् मिस्डकॉल नंबर.. राहुल गांधींचं अभियान, आयोगाला भिडणार

Rahul Gandhi on ECI : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi on ECI) मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात पुरावे देऊन त्यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांनाही घाम (Election Commission) फोडला आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
वोट चोरी ‘एक व्यक्ति, एक वोट’ के बुनियादी लोकतांत्रिक सिद्धांत पर हमला है।
स्वतंत्र और निष्पक्ष चुनावों के लिए साफ़-सुथरी मतदाता सूची अनिवार्य है।
चुनाव आयोग से हमारी मांग साफ़ है – पारदर्शिता दिखाएं और डिजिटल मतदाता सूची सार्वजनिक करें, ताकि जनता और राजनीतिक दल उसका खुद ऑडिट… pic.twitter.com/BIahCz2YBb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 10, 2025
या अभियानाची माहिती देताना राहुल गांधी यांनी सांगितलं की मतांची चोरी एक व्यक्ती, एक मत या तत्वावर हल्ला आहे. स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुकीसाठी योग्य मतदार यादी असायलाच हवी. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने निवडणुकीत गडबड झाल्याचे आरोप पुन्हा केले आहेत. या अभियानात लोकांनी सहभागी व्हावे आणि मतचोरी थांबवण्याचे आवाहन केले.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचं मोठं विधान, राहुल गांधींच्या आरोपांनंतर केला मोठा खुलासा
निवडणूक आयोगाने पारदर्शकता दाखवावी आणि डिजीटल मतदार यादी सार्वजनिक करावी जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः याचे ऑडीट करू शकतील अशी आमची मागणी आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोकांनीही या अभियानात सहभागी व्हावे. यासाठी http://votechori.in/ecdemand या वेबसाइटला भेट द्या तसेच 9650003420 या नंबर मिसकॉल द्या असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
पुरावे आणि तथ्यांसह वक्तव्ये करा – ECI
राहुल गांधी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आयोगावर गंभीर आरोप केले होते. यावर निवडणूक आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव प्रकरणाचा उल्लेख केला होता. परंतु, या प्रकरणी 2018 मध्ये कार्यवाही करण्यात आली होती अशी माहिती आयोगाने दिली. राहुल गांधी यांनी केलेले आरोप तथ्यांवर आधारीत नाहीत. यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्याा नेत्यांनी तथ्ये आणि पुराव्यांसह वक्तव्ये केली पाहिजेत अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली.
राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम? शरद पवारांच्या खळबळजनक आरोपांवर.. CM फडणवीसांनी दिलं उत्तर