माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचं मोठं विधान, राहुल गांधींच्या आरोपांनंतर केला मोठा खुलासा

माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचं मोठं विधान, राहुल गांधींच्या आरोपांनंतर केला मोठा खुलासा

O.P. Rawat former Election Commissioner : लोकसभा निवडणुकीतील बोगस मतदार प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ओ.पी. रावत यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे. (Election) रावत यांनी स्पष्ट केलं की, बेंगळुरुमधील कथित बोगस मतदारांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी. त्यासाठी आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता तपास सुरू करायला हवा असंही ते म्हणाले आहेत.

ओ पी रावत यांनी द टेलिग्राफशी बोलताना मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना, कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्यास आम्ही तात्काळ स्वतःहून तपास सुरू करत होतो आणि जनतेसमोर सत्य ठेवत होतो. अशा प्रकरणांत आम्ही पक्षांकडून आधी तक्रार मागत नव्हतो असं मत नोंदवलं आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरावरील मत चोरीच्या आरोपांमुळं निर्माण झालेला वाद आता निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा? निवडणूक आयोगावर बॉम्ब; राहुल गांधींनी दिला पुरावा

यावेळी राहुल गांधी यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत बेंगळुरु सेंट्रल मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखांहून अधिक बोगस मतदार होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही मतदारांचे नाव दोन किंवा अधिक वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदवलं गेलं होतं आणि त्यांनी दोन्हीकडे मतदान केले. एकाच व्यक्तीची वारंवार नोंदणी झाली आहे, चुकीचे पत्ते आहेत, एका खोलीच्या घरात 80 जणांचे नोंदणी झाली आहे आणि काही मतदार इतर राज्यांतही नोंदणीकृत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसने 8 ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये या मुद्द्यावर आंदोलन केले. त्याच दिवशी सकाळी काही लोकांना मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी आल्याने, राहुल यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने छेडछाड केली असल्याचा संशय व्यक्त झाला. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळले. आयोगाने एका ‘एक्स’ पोस्टमध्ये राहुल गांधींना आव्हान दिलं की, प्रत्येक कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनीही काँग्रेसला पुरावे सादर करण्यास सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube