महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांच्या जागा वाटपावर राहुल गांधी नाराज; ‘CEC’ च्या बैठकीतून अचानक बाहेर पडल्याची चर्चा

  • Written By: Published:
महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांच्या जागा वाटपावर राहुल गांधी नाराज; ‘CEC’ च्या बैठकीतून अचानक बाहेर पडल्याची चर्चा

Rahul Gandhi On Mahavikas Aghadi Seat Allotment : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. (Rahul Gandhi ) मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. (Mahavikas Aghadi ) विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिल्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत राहुल गांधींनी बैठकीत मत व्यक्त केलं. त्यानंतर राहुल गांधी ही बैठक सोडून निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, त्यानंतरही सुमारे तासभर मीटिंग सुरू होती. मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रहामुळे काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या आहेत. मविआ टिकवण्यासाठी काँग्रेसला काही जागांवर पाणी सोडावं लागल्याने राहुल गांधी नाराज आहेत.

Video: जयश्री थोरात रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून; अखेर पहाटे वसंत देशमुखांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर राहुल गांधी यांनी आक्षेप व्यक्त केला, ज्यांची नावं बड्या नेत्यांनी पुढं केली होती. या उमेदवारांच्या निवडीच्या निकषांवरही राहुल यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी अनेक जागांवर उमेदवार म्हणून तिकीट मिळावं यासाठी आपले नातलग किंवा जवळच्या लोकांची नावं पुढे केली आहेत. अनेक नेते तर असेही आहेत ज्यांनी कुटुंबातील सदस्यांसाठीच तिकीट मागितलं. मात्र, त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

लवकरच आम्ही उमेदवारांच्या नावांची दुसरी आणि तिसरी लिस्ट जाहीर करू. महाराष्ट्र आमची उत्तम कामगिरी लवकरच दिसेल. राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचंच सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठठ नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. आम्ही काही जागांची मागणी करत आहोत. आम्हाला ज्या जागा मिळाल्या आहेत, तेथे आम्ही ओबीसींना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube